Sugar Factory  Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Factory : शिरपूर साखर कारखाना सुरू होणार

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना (शिवाजीनगर दहिवद, ता. शिरपूर) भाडेतत्त्वावर देण्यास सर्व सभासदांनी विशेष सर्वसाधारण सभेने बहुमताने मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

धुळे ः शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) (शिवाजीनगर दहिवद, ता. शिरपूर) भाडेतत्त्वावर देण्यास सर्व सभासदांनी विशेष सर्वसाधारण सभेने बहुमताने मंजुरी दिली आहे. त्यामुळे कारखाना सुरू करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू झाली आहे. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होणार असून, निविदाप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. इच्छुकांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन कारखान्यातर्फे तज्ज्ञ संचालक तथा आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले आहे.

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया ही प्रगती, आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे, तालुक्यातील जनतेस रोजगार उपलब्धता, आदिवासी, गरीब व कष्टकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी करण्यात येत आहे. चांगल्या प्रकारे उत्पन्न, ऊस पिकासाठी लागणारे भरपूर पाणी, सुपीक जमीन आदी कारखान्याजवळ असल्याने वाहतूक खर्च कमी होतो. या सर्व पार्श्‍वभूमीवर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे कारखान्यातर्फे सांगण्यात आले. त्यासाठी १० सप्टेंबर २०२२ ला विशेष सर्वसाधारण सभा झाली.

या सभेत कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा विषय घेण्यात आला व सभासदांनी ठरावास बहुमताने मंजुरी दिली. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक होणार आहे. निविदाप्रक्रिया ऑनलाइन व निःपक्षपातीपणे असल्याने कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन चालविण्यासाठी इच्छुकांनी या प्रक्रियेत सहभागाचे आवाहन कारखान्यातर्फे आमदार पटेल यांनी केले आहे. दरम्यान, कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे व बँकेच्या संचालक मंडळाचेही संपूर्ण सहकार्य आहे.

कारखान्याची स्थिती, वैशिष्ट्ये

कारखाना मुंबई-आग्रा महामार्गावर, शिरपूर शहरापासून सात किलोमीटर अंतरावर, कारखान्यापासून मध्य प्रदेश केवळ १७ किलोमीटरवर, अनेर आणि करवंद धरणासारखे लघु आणि मोठे पाटबंधारे प्रकल्प तसेच तापी नदी जवळ. जागोजागी प्रत्येक नदी व उपनदीवर केटीवेअर बंधारे.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चार तालुके, १६६ गावांचा समावेश. त्यांपैकी १२४ गावे शिरपूर तालुक्यात. मध्य प्रदेश, चोपडा तालुक्यातील गावे कारखाना कार्यक्षेत्रात, एकूण सभासदसंख्या १३ हजार ७००, कारखाना २५०० टीसीडी क्षमतेचा, ऊस लागवडीखालील जमीन ५,३०,३८४.०० हेक्टर, यापैकी ७० टक्के जमीन सिंचनाखाली, कारखाना सुरू असताना कारखान्याची गाळपक्षमता औरंगाबाद विभागात सर्वाधिक ऊसगाळप.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Import Policy: आत्मनिर्भरतेला वाटाण्याच्या अक्षता

Fake Fertilizers: वर्षभरात आठ कोटींच्या संशयास्पद निविष्ठा जप्त

River Conservation: ...और कारवाँ बनता गया

Pre Monsoon Rain: पूर्वमोसमी पावसाचा रुद्रावतार कायम

Cotton Market: आगामी हंगाम कापसास पोषक?

SCROLL FOR NEXT