Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Sharad Pawar vs Ajit Pawar : “आपलं नाणं खोटं आहे हे त्यांना माहितीय म्हणूनच …”, शरद पवारांनी घेतला समाचार

Sharad Pawar Meeting : राष्ट्रवादीच्या बंडखोरीनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Team Agrowon

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आज झालेल्या बैठकीत अजित पवार यांच्या गटाच्या पोस्टर शरद पवारांचा फोटो लावण्यात आला होता. यावरून शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. आपलं नाणं खोटं आहे याची खात्री आमच्या मित्रांना आहे. त्यामुळेच त्यांच्या बैठकीत आणि मेळाव्यात माझा मोठा फोटो लावण्यात आला अशा शब्दात टीका शरद पवार यांनी केली.

अजित पवार यांच्या गटाच्यावतीने वांद्रे येथील एमईटी सभागृहात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अजित पवारांनी निवृत्तीच्या वयाची आठवण करून देत शरद पवारांवर टिका केली. मात्र, त्यास शरद पवार यांनी शांत आणि संयमी प्रतित्तुर देत भाजपवर आणि राष्ट्रवादीमधील बंडखोर आमदारांवर टीका केली.

शरद पवार म्हणाले, आमच्या मित्रांचा मेळावा झाला त्यात फोटो पाहिले का? सगळ्यात मोठा फोटो होता माझा. मुंबईत पोस्टर लावली की फोटो माझा. त्यांना माहित आहे आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे चालणारं नाणं घेतलं पाहिजे. त्यांचं नाणं खरं नाही ते खणकन वाजणार नाही अडचण नको म्हणून त्यांनी माझा फोटो वापरला आहे, असे चिमटा काढला.

आपल्या काही सहकाऱ्यांनी बाजूला जायची भूमिका घेतली. माझी तक्रार नाही पण दुःख आहे. कारण लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे. कार्यकर्त्यांनी अपार मेहनत केली होती. जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्याच विचारांच्या पंक्तीला जाऊन बसणं योग्य नाही. एवढंच मला आज सांगायचं आहे. भाजपसोबत जे लोक गेले ते संपले हा इतिहास आहे, याची आठवण शरद पवारांनी करून दिली.

पवार म्हणाले, सध्या दिसतंय काय? नाशिकला पक्षाच्या ऑफिसमध्ये काही गडबड झाली. ऑफिस कुणाचं तर राष्ट्रवादीचं. उद्या कुणीही उठलं आणि मी काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे असं सांगितलं तर याला काही अर्थ आहे? ही गोष्ट लोकशाहीत योग्य आहे का?

पक्षाची प्रॉपर्टी आहे ती काही लोक ताब्यात घेतात. पक्ष आमचा आहे, घड्याळ आमचं आहे असा दावा करतात. तुम्हाला आज स्पष्ट सांगतो की खूण कुठेही जाणार नाही. चिन्ह कुठेही जाणा नाही आणि जाऊ देणार नाही. जोपर्यंत आपल्या पक्षाचा विचार सामान्य माणसाच्या अंतःकरणात आपलं स्थान आहे तोपर्यंत काहीही चिंता करायचं कारण नाही. हे मी तुम्हाला सांगतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Theft: केळेवाडीत डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला

Shaktipeeth Highway Project: वाकाव, उंदरगावात ‘शक्तिपीठ’ जीपीएस मोजणीचे काम सुरू

Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल दर्शन बारीसाठी ‘पाॅली कार्बोनेट’

White Grub Management: अडीच हजार शेतकऱ्यांनी उभारले प्रकाश सापळे

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक

SCROLL FOR NEXT