Agriculture Theft: संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी एका शेतकऱ्याच्या डाळिंब बागेतून सुमारे ३०० कॅरेट डाळिंब चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीस गेलेल्या डाळिंबांची किंमत सुमारे ९ लाख रुपये असल्याचा अंदाज असून, या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..केळेवाडी येथील शेतकरी बबन कुऱ्हाडे यांनी सुमारे सहा एकर क्षेत्रात भगवा जातीची डाळिंब बाग विकसित केली आहे. सध्या बाजारात डाळिंबाला चांगला दर मिळत असल्याने बागेतील फळे काढणीसाठी तयार होती. चार दिवसांपूर्वी सायंकाळपर्यंत बागेतील नियमित कामे सुरू होती. .Pomegranate Theft Issue: डाळिंब बागेत चोरी; सहा लाखांचे नुकसान.डाळिंब चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने कुऱ्हाडे आणि त्यांचा मुलगा यांनी रात्री बागेतच मुक्काम करून राखण केली होती. मात्र, अज्ञात चोरट्यांनी संधी साधून मोठ्या प्रमाणात डाळिंबांची चोरी केल्याचे समोर आले. सकाळी बागेची पाहणी करताना मोठ्या प्रमाणात फळे गायब असल्याचे निदर्शनास आले. तपासणीत सुमारे ३०० कॅरेट डाळिंब चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. चोरीमुळे सुमारे ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे..Pomegranate Heatwave Damages: उन्हामुळे डाळिंब बागायतदारांच्या स्वप्नांना तडे.या प्रकरणी बबन कुऱ्हाडे यांनी घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे..संगमनेर तालुक्यात डाळिंबाला सध्या चांगला बाजारभाव मिळत असल्याने फळचोरीच्या घटनांबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. उन्हाळी परिस्थितीत फळबागा सांभाळण्याबरोबरच बागेची राखण करण्याचे अतिरिक्त आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.