Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवार आजपासून राज्यव्यापी दौऱ्यावर

Maharashtra NCP Crisis : राज्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करावा, हा आग्रह केला.

Team Agrowon

Mumbai News : ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आजपासून (ता. ८) नाशिकच्या येवला इथून राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ फोडणार आहेत,’’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी शुक्रवारी (ता. ७) दिली.

तपासे म्हणाले,‘‘राज्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करावा, हा आग्रह केला. त्यानुसार आज (ता. ८) रोजी नाशिक जिल्ह्याचा दौरा जाहीर केला आहे.

सकाळी आठ वाजता सिल्व्हर ओक या निवासस्थानावरून पवार निघतील. पवार यांचे ठाणे, भिवंडी, पडगा, शहापूर, इगतपुरी या मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जोरदार स्वागत करणार आहेत.’’\

नव्या नियुक्त्यांबाबत तपासे म्हणाले, ‘‘पदावर नुसती नियुक्ती जाहीर करून होत नसते. तर त्यासाठी क्रियाशील सदस्यांची बैठक घ्यावी लागते. त्यामध्ये ठराव घ्यावा लागतो. त्यानंतरच प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होते.

प्रफुल्ल पटेल यांनी सुनील तटकरे यांची निवड केली ती स्वतः केली. त्यांची क्रियाशील सदस्यांची बैठक झाली नाही. आणि गुरुवारी (ता.६) राष्ट्रवादी काँग्रेसची दिल्लीत कार्यकारिणी समितीची बैठक झाली. त्यामध्ये २४ प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. तसा ठरावही झाला आहे.’’

‘नियमबाह्य कोण हे जनता ठरवेल’

‘‘नियमबाह्य काय आहे हे जनता ठरवेल. त्यांनी सांगून काही होत नसते. ‘राष्ट्रवादी’चे राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब आहेत. २४ राज्यामध्ये पक्षाचा विस्तार आहे. अनेक ठिकाणी निवडणूक लढविली आहे. महाराष्ट्रात काही आमदारांच्या सह्या घेऊन स्वतः ला राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करू शकत नाहीत. केरळमध्ये आमदार आहेत, तिथे सरकारमध्ये प्रतिनिधी आहेत. लक्षद्वीपमध्ये खासदार आहे,’’ असेही तपासे यांनी स्पष्ट केले.

येवल्यातील सभेसाठी गावोगावी बैठका

‘‘येवला येथील सभेसाठी पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. आज (ता. ८) दुपारी ४ वाजता श्री. पवार यांची सभा होईल. या सभेला शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार मारोतराव पवार, माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. सभेसाठी नेते, कार्यकर्ते, समर्थकांत उत्साह आहे. गावोगावी बैठका घेऊन नियोजन केले आहे’’, अशी माहिती माणिकराव शिंदे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT