Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

IMD Rainfall: सप्टेंबरमधला पाऊस खरीप पिकांसाठी मारक?

टीम ॲग्रोवन

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) (Indian Meteorological Department) अंदाजानुसार सप्टेंबरमध्ये राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (More Rainfall In September) होणार आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे सोलापूर, बीड, उस्मानादाबाद, लातूर, नांदेड, गडचिरोली या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूपच जास्त पाऊस होण्याची शक्यता (Rain Forecast) आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton), भात, उडीद, मुगाला फटका बसू शकतो. शेतमालाची गुणवत्ता खराब होऊन कमी दराने शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते.

मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीच्या तुलनेत ९ टक्के जास्त पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी जाहीर केला. आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतात पावसाच्या असमान वितरणामुळे खरीप पिकांचं उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तसेच ईशान्य भारतातील बहुतांश भाग वगळता भारताच्या उर्वरित भागात सर्वसाधारण ते साधारण पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व आणि वायव्य भारतातील काही भागांमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतातील कापूस, सोयाबीन आणि कडधान्याचं उत्पादन घेणाऱ्या मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. तर भात उत्पादक असलेल्या पूर्व आणि ईशान्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. जागतिक व्यापारी संस्थेशी निगडित मुंबईस्थित डिलरने रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस खरीप पीक काढणीला येतं. या काळात अतिवृष्टी झाल्यास कापूस आणि सोयाबीन पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

भात उत्पादनाविषयी माहिती देताना या डिलरने सांगितले, "यंदा मॉन्सून रखडल्याने प्रमुख भात उत्पादक असलेल्या पूर्वेकडील राज्यांमध्ये भात लागवडीला उशीर झाला. सध्या या पिकाला पावसाची गरज आहे. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे. त्यामुळे भात पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. " तांदळाच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा मोठा आहे. भारत हा तांदूळ निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. भारतातील भातशेती ही मॉन्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे भारतातील भात उत्पादन घटल्यास त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या व्यापारावर होईल.

बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या भात उत्पादक राज्यांत ४४ % पर्यंत पावसाची तूट नोंदवली गेली आहे. पावसाने ओढ दिल्याने या हंगामात भाताची लागवड ६ टक्क्यांनी घटली आहे. सध्या कणी तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध घालायचे की नाही यावर केंद्राचा विचार सुरु असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

Government Contractor Movement : सर्व विभागांतील कंत्राटदारांचे ७ मेपासून काम बंद आंदोलन

Loksabha Election : निवडणुकीच्या पाहणीसाठी २३ देशांचे ७५ अभ्यासक दाखल

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT