Crop Damage : सिन्नर, इगतपुरीत पावसामुळे पिकांचे नुकसान

सिन्नर तालुक्यात बुधवारी (ता. ३१) रात्री ८ पासून पावसाला सुरुवात होऊन पहाटे ३ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पांढुर्ली, शिवडा परिसरात अतिवृष्टीमुळे सर्वत्र पिकांचे नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नाशिक ः जिल्ह्यात पावसाने ऑगस्टमध्ये खंड दिल्यामुळे उन्हाचा चटका (Temperature) जाणवत होता. अशातच ऑगस्टअखेर पावसाने पुन्हा हजेरी लावली. काही ठिकाणी पिकांना पावसाची (Rain) गरज होती; मात्र इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दाणादाण उडाली. जिल्ह्यात ९ तालुक्यांमध्ये विविध २८ महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे.

Crop Damage
Crop Damage Survey : पीक नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी पैसे देऊ नका

सिन्नर तालुक्यात बुधवारी (ता. ३१) रात्री ८ पासून पावसाला सुरुवात होऊन पहाटे ३ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पांढुर्ली, शिवडा परिसरात अतिवृष्टीमुळे सर्वत्र पिकांचे नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे काही क्षणात परिसर जलमय झाला होता. येथील परिसरात पाझरतलाव फुटल्याने पावसाचे पाणी शेतात शिरून भात, टोमॅटो यासह इतर भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत मुसळधार पावसामुळे वडगाव सिन्नर येथील देवनदीला पूर आला होता. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शेतकरी प्रामुख्याने भाजीपाला लागवडी करतात. ज्यामध्ये टोमॅटो हे प्रमुख पीक आहे. या भागांतील लागवडी पावसामुळे जमीनदोस्त झाल्या. ज्या लागवडी बांधणीवर होत्या, अशा लागवडी जमिनीला लोळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Crop Damage
Crop Damage compensation : अतिवृष्टिग्रस्तांना ३५ कोटी रुपये भरपाई मिळणार

सटाणा तालुक्याच्या उत्तर भागांत जोरदार पाऊस झाला आहे. मध्यरात्री १ वाजेपासून विजांच्या कडकडाटात वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे काही भागात बाजरी, मका या पिकांना फटका बसला आहे. देवळा तालुक्यात रात्री पावणेदोन वाजता पावसास सुरुवात होऊन पहाटे पाच वाजेपर्यंत जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. येथेही मका व बाजरी पिके पडली. निफाड तालक्यात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. जिल्ह्याच्या पूर्व भागातील निफाड व येवल्यात पावसामुळे सोयाबीन, मका व इतर पिकांना जीवदान मिळाले.

८ धरणांतून विसर्ग सुरू

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने मुसंडी मारल्याने दारणा (४, ८८४ क्युसेक), मुकणे (७२६), कडवा (४,२२०), वालदेवी (४०७), गंगापूर (५८८४), आळंदी (२१०), भोजापूर (३,७७०) व पालखेड (१,६९६) या धरणांतून विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातूनही विसर्ग वाढवण्यात आला असून दुपारी चार वाजता ३६,७३१ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला.

महसूल मंडले पाऊस ................(मिमी/१ सप्टेंबर)

वडनेर ६६

सौंदाणे ७१

निमगाव ७१

बागलाण ९८

वीरगाव ९८

नवीबेज ८५

मोकभनगी ८५

उंबरठाणा ७६

सुरगाणा ७५

मखमलाबाद ८६

दिंडोरी ९४.५

इगतपुरी ११०

घोटी ९८

वाडीवऱ्हे ७९

नांदगाव १०६

टाकेद १०४

धारगाव ११०

सिन्नर ६९

पांढुर्ली ११८

डुबेरे ७३

देवपूर ७२

वावी ६५

शहा ९५

नांदूर ७०

रायपूर ७३

दुगाव ७३

वेळूजे ६७

हरसूल ६७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com