Animal Feed Agrowon
ताज्या बातम्या

Animal Feed Production : पशुखाद्य उत्पादनासाठी आता राज्याची स्वतंत्र नियमावली

Animal Care : पशुपालन व दुग्धोत्पादनात पशुखाद्याचा दर्जा महत्त्वाचा ठरतो. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात पशुखाद्याची गुणवत्ता निश्‍चित करण्याकरिता नियमावली तयार करण्यात आली आहे.

Team Agrowon

Nagpur News : पशुपालन व दुग्धोत्पादनात पशुखाद्याचा दर्जा महत्त्वाचा ठरतो. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात पशुखाद्याची गुणवत्ता निश्‍चित करण्याकरिता नियमावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये शिफारशीत मानकानुसारच पशुखाद्याचा दर्जा राखण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्र शासनाच्या फूड्स सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्डस ऑफ इंडिया या संस्थेने त्यांच्या १७ डिसेंबर २०१९ तसेच २७ जानेवारी २०२० च्या पत्रातील निर्देशाप्रमाणे पशुखाद्याचे उत्पादन व विक्री याकरिता आयएसआय मार्क (बीएसआय प्रमाणकाप्रमाणे) असणे बंधनकारक केले आहे. राज्यातही आता आयएसआय मार्क पशुखाद्य उत्पादन व विक्री होणार आहे. त्यासोबतच पशुखाद्याच्या बॅंगवर त्यातील घटकांची माहिती नोंदविणे सक्‍तीचे करण्यात आले आहे.

त्यामध्ये क्रूड प्रोटीन, क्रूड फॅट, क्रूड फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, ऍश, माईश्‍चर याबाबींचा समावेश आहे. त्यासोबतच अन्नघटकांच्या प्रमाणकासोबत पॅकिंग बॅगवर उत्पादन संस्थेचे नाव, परवाना क्रमांक, पशुखाद्य उत्पादन तारीख, उत्पादन वापरण्याचा अंतिम दिनांक, बॅच क्रमांक, निव्वळ वजन, विपणन कंपनीचे नाव व पत्ता या बाबी नमुद असाव्या असेही शासन आदेशात म्हटले आहे.

ज्या पशुखाद्य कंपन्यांनी बीआयएस (भारतीय मानक संस्था) खाली नोंदणी केली नसेल अशांनी शासन आदेश निर्गमित झाल्याच्या (ता.१४ जुलै) पासून एक महिन्याच्या आत असा परवाना घेण्याची कार्यवाही करावी, अन्यथा अशा पशुखाद्य उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाची विक्री बाजारात करता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.

नमुन्याचे होणार पृथ्थकरण

पशुखाद्याचे उत्पादन ज्या तालुक्‍यात होत असेल त्या भागातील सहायक आयुक्‍त पशुसंवर्धन यांच्या उपस्थितीत उत्पादित सर्व पशुखाद्याचे रॅंडमली नमुने घेण्यात येणार आहेत. या नमुन्यांची शासनमान्य प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल. त्याच्या अहवालानुसार पशुखाद्य मानकाप्रमाणे नसल्यास अशा उत्पादकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही शासन आदेशात नमुद असल्याने पशुखाद्य उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT