Sugarcane FRP Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane FRP : 'छत्रपती'चा दुसरा हप्ता १५० रुपये प्रतिटन

Chhatrapati Sugar Mill : श्री छत्रपती कारखान्याने गेल्या वर्षीच्या सन २०२२-२३ च्या गळीत हंगामामध्ये सुमारे ८ लाख ९५ हजार टन उसाचे गाळप केले होते.

Team Agrowon

Pune News : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२२-२३ च्या गळीत हंगामातील उसाचा दुसरा हप्ता १५० रुपये प्रतिटनाप्रमाणे सभासदांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.

श्री छत्रपती कारखान्याने गेल्या वर्षीच्या सन २०२२-२३ च्या गळीत हंगामामध्ये सुमारे ८ लाख ९५ हजार टन उसाचे गाळप केले होते. त्यातून ९ लाख ४९ हजार ५९५ क्विंटल साखरेची निर्मिती झाली.

गेल्या गळीत हंगामामध्ये सरासरी १०.६१ टक्के साखरेचा उतारा मिळाला होता. गळीत हंगामातील एफआरपीची रक्कम प्रतिटन २४६२.४४ रुपये होती. कारखान्याने यापूर्वी २३५० रुपयांचा पहिला हप्ता सभासदांना दिला होता.

कारखान्याने दुसरा हप्ता १६० रुपये प्रतिटन काढला असून, यामध्ये १० रुपये प्रतिटन भागविकास निधीसाठी कपात केली आहे. उर्वरित १५० रुपये प्रतिटनाप्रमाणे १३ कोटी ४८ लाख रुपये सभासदांच्या खात्यावर जमा केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT