Gram Panchayat by-election on 18th January in Akola district
Gram Panchayat by-election on 18th January in Akola district 
ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : चांदूरबाजार तालुक्यातील सरपंचपदाचे उमेदवार दारोदारी

Team Agrowon

चांदूरबाजार, अमरावती : सरपंचपदाच्या थेट निवडणुकीने (Election) ग्रामीण भागातील राजकीय (Political) समीकरणे बदलली आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना दुसऱ्यांदा थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) मतदानाची संधी मिळणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे नशीब लय भारी असून सरपंचपदाचे उमेदवार लोकांच्या दारोदारी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत असल्याची चर्चा आहे.

ग्रामपंचायतच्या निवडणुका आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार आहे. विधानसभा २०२४ मध्ये होणाऱ्या मिनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठीची पेरणी असणार आहे. सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्यामुळे आपल्याच पक्षाचा सरपंच हवा, असे राजकीय पक्षांचे स्वप्न असते. मात्र, अन्य पक्षातील नेत्यांची मदत या निवडणुकीच्या निमित्ताने होत असते. त्यामुळे थेट सरपंचपदाचा उमेदवार निवडताना गावपुढाऱ्यांची चांगलीच कसरत होणार आहे. तालुक्यातील आखतवाडा, बेलज, बेलमंडळी,

कल्होडी, कोंडवर्धा, लाखनवाडी, बेलोरा, मासोद, बोदड, निंभोरा, बोरगाव मोहना, रसुल्लापूर, चिंचोली काळे, रतनपूर, धानोरापूर्णा, रेडवा, घाटलाडकी, सर्फापूर, गोविंदपूर, टाकरखेडापूर्णा, हैदतपूर, जैनपूर, तळवेल या २४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकी होणार आहेत. ग्रामपंचायतीतील सत्ता कायम ठेवण्यासाठी जनप्रतिनिधींची पुन्हा धडपड सुरू आहे. सर्वसाधारण सरपंच असणाऱ्या गावांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नेत्यांचीही डोकेदुखी वाढत आहे.

सातवी उत्तीर्णची अट अन् खर्चमर्यादा

सात ते नऊ सदस्यसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतच्या सदस्यपदासाठी २५ हजार, तर सरपंचपदासाठी ५० हजार तसेच ११ ते १३ सदस्यसंख्येसाठी ३५ हजार, सरपंचासाठी १ लाख त्याचप्रमाणे १५ ते १७ सदस्यसंख्येसाठी ५० हजार, सरपंचसाठी पावणेदोन लाख रुपये खर्च मर्यादा आहे.

तर जानेवारी १९९५ नंतर एक तारखेला जन्मलेल्या व्यक्तीला निवडणूक लढविण्यासाठी सातवी उत्तीर्णची अट आहे. शिवाय, ग्रामपंचायत येणे बाकी नसलेले प्रमाणपत्र, शौचालयाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागणार आहे, अशी माहिती निवडणूक नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT