Public Administration: गावातील पाणीपुरवठा योजना, पाणंद रस्ते, अंगणवाडी व शाळा इमारती, स्मशानभूमी, घरकुल तसेच सौरऊर्जा योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडवाव्यात. ग्रामविकास प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून प्रशासकीय यंत्रणांनी ग्रामविकासाच्या योजनांची प्रभावी व वेळेत अंमलबजावणी करावी.