palakhi
palakhi agrowon
ताज्या बातम्या

संत तुकाराम महाराज पालखीचे २० जूनला प्रस्थान

Shamika Bavikar

अॅग्रोवन वृत्तसेवा

पुणे :गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे वारकऱ्यांना जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पायी वारी सोहळा अनुभवता आला नाही. मात्र, यंदा वैष्णवांना हा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवता येणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी श्री क्षेत्र देहूगाव येथून २० जूनला प्रस्थान ठेवणार आहे. २३ जूनला पालखी पुण्यात मुक्कामी असेल. पालखी नऊ जुलैला पंढरपूरला पोचेल, अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे यांनी दिली.


संस्थानने पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पालखी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नैमित्तिक कामे संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आली. परंपरेनुसार यंदा पालखी सोहळा पंढरपुरला मार्गस्थ होत असताना पुणे येथील नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात दोन मुक्काम करणार आहे. तर इंदापूर येथे पालखी तळावर दोन दिवस मुक्काम होईल. इतर ठिकाणी एकच मुक्काम होणार आहे. प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले तर सराटी येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे. माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले बोंडले येथे धावा तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरी येथे पादुका आरती होईल, असेही हभप मोरे यांनी सांगितले.

यंदा १३ जुलैला पालखीच्या परतीच्या प्रवासाची सुरूवात होईल. पालखी सोहळ्याची सांगता २४ जुलैला देहूच्या मुख्य मंदिरात होणार आहे. पालखी मार्गावर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने वारकऱ्यांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो, असे सांगण्यात आले.

असा आहे पालखी सोहळ्याचा मार्ग व नियोजन

२० जूनः देहूतील मुख्य मंदिरात पालखी प्रस्थान, पहिला मुक्काम श्री क्षेत्र देहूगाव येथील इनामदार साहेब वाड्यात

२१ जूनः आकुर्डी विठ्ठल मंदिर

२२ व २३ जूनः श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, नाना पेठ, पुणे

२४ जूनः लोणी काळभोर

२५ जूनः वरवंड

२७ जूनः उंडवडी

२८ जूनः बारामती शारदा विद्यालय

२९ जूनः सणसर (पालखी तळ)

३० जूनः दुपारचे बेलवडी गोल रिंगण, नंतर आंथुर्णे (पालखी सोहळा)

१ जुलैः निमगाव केतकी (पालखी तळ)

२ जुलैः इंदापूर येथे गोल रिंगण, दोन दिवस मुक्काम

४ जुलैः सराटी ५ जुलै अकलूज (माने विद्यालय येथे गोल रिंगण)

६ जुलैः माळीनगर येथे उभे रिंगण बोरगाव

७ जुलैः तोंडले बोंडले येथे धावा, पिराची कुरोली मुक्काम

८ जुलैः बाजीराव विहीर येथे उभे रिंगण, वाखरी येथे मुक्काम

९ जुलैः पादुका आरती येथे उभे रिंगण झाल्यावर पंढरपूरकडे प्रस्थान, रात्री पंढरपूर येथे श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी विसावणार आहे.

१० जुलैः नगर प्रदक्षिणा करून पालखी १३ जुलै दुपारी एक वाजेपर्यंत पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे.

१३ जुलैः दुपारी परतीच्या प्रवासाला सुरुवात

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : वादळी पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम

Mango Season : हापूसच्या लोकप्रियतेत रायवळ आंबा गायब

Panhala Monsoon Rain : पन्हाळा तालुका पूर्वहंगामी पावसाच्या प्रतीक्षेत; खरिपाच्या मशागतीसाठी पावसाची गरज

Sangli DCCC Bank : सांगली जिल्हा बॅँकेची ‘८८’अंतर्गत चौकशी सुरू

Fodder Shortage : चाऱ्याअभावी पशुधन संकटात

SCROLL FOR NEXT