Turmeric Seed Agrowon
ताज्या बातम्या

Turmeric Seed : हळद बियाण्याची अवघी १६० टनांचीच विक्री

Turmeric Market Update : हळद लागवड सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला. परंतु हळद बियाण्यांच्या मागणीत वाढ झालेली नाही. बाजार समितीतून दोन महिन्यांत अवघ्या १६० टन बियाण्यांची विक्री झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : हळद लागवड सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला. परंतु हळद बियाण्यांच्या मागणीत वाढ झालेली नाही. बाजार समितीतून दोन महिन्यांत अवघ्या १६० टन बियाण्यांची विक्री झाली आहे. लागवडीस एक महिन्याचा कालावधी असला, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५ हजार टनांनी बियाणे विक्री घटण्याचा अंदाज बियाणे विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात हळद लागवड मार्च महिन्यात अर्थात अक्षय तृतीयेपासून सुरू होते. त्या अगोदर १५ ते २० दिवसांपूर्वी हळदीचे बियाणे सांगली बाजार समितीत विक्रीसाठी येते. हे बियाणे तमिळनाडूसह अन्य हळद उत्पादक राज्यातून विक्रेते बियाणे घेऊन येतात. सांगली बाजार समितीत दरवर्षी हळदीचे बियाणे विक्रीस येते. त्याचप्रमाणे शेतकरी स्वतःकडील बियाणे लागवड करण्यासाठी वापरतो.

बाजार समितीत मागणीनुसार बियाण्यांची आवक होते. गेल्या वर्षी दोन महिन्यांत सुमारे २ ते ३ हजार टन बियाण्यांची विक्री झाली. तीन महिन्यांत अंदाजे ५५०० ते ६००० टन बियाणे विक्री झाली. यंदाच्या हंगामात मागणीनुसार बियाणे विक्रीस आले होते. परंतु हळदीला अपेक्षित दर मिळत नसल्याने बियाण्यांच्या मागणीत घट झाली आहे.

दोन महिन्यांत अवघे १६० टन बियाण्यांची विक्री झाली आहे. बियाणे विक्रीस अजून एक ते दीड महिन्याचा कालावधी आहे. परंतु या कालावधीत अंदाजे ४०० ते ५०० टन बियाणे विक्रीचा अंदाज बियाणे विक्रेत्यांनी केला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४५०० ते ५००० टनांनी बियाण्यांची घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दीड महिन्याच्या काळात १६० टन बियाणे विक्री झाली. हळददराचा फटका बियाणे मागणीवर झाला आहे. यंदा हंगामात हळद बियाण्यांच्या मागणीत लक्षणीय घट झाली असल्याचे चित्र आहे.
- कलंदर मकानदार, हळद बियाणे विक्रेते, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT