Turmeric Production : हळदीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवावी

Turmeric Crop : उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविली, तरच हळद पीक परवडेल. त्यादृष्टीने आवश्यक तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा. काटेकोर व्यवस्थापनातून निर्यातक्षम हळदीचे उत्पादन घेतल्यास अधिक नफा मिळणे शक्य होईल.
Turmeric Production Guidance
Turmeric Production Guidance Agrowon
Published on
Updated on

Turmeric Farming In Hingoli : ‘‘उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविली, तरच हळद पीक परवडेल. त्यादृष्टीने आवश्यक तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा. काटेकोर व्यवस्थापनातून निर्यातक्षम हळदीचे उत्पादन घेतल्यास अधिक नफा मिळणे शक्य होईल,’’ असे प्रतिपादन तोंडापूर (जि. हिंगोली) येथील कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विशेषज्ञ अनिल ओळंबे यांनी केले.

आडगाव रंजे (ता. वसमत) येथे मंगळवारी (ता.२३) ‘ॲग्रोवन’तर्फे आयोजित व रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि. तर्फे प्रायोजित ‘हळद लागवड व व्यवस्थापन’ या विषयावर ‘ॲग्रोवन संवाद’ चर्चासत्रात ते बोलत होते. दिलीपराव चव्हाण अध्यक्षस्थानी होते.

रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि. चे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ शिवराज लोणाळे, उत्तर मध्य महाराष्ट्र व्यवस्थापक विकास कुलकर्णी, महेश गावंडे, उमेश कुमकर, प्रगतिशील शेतकरी पंढरीनाथ चव्हाण, अंकुश चव्हाण, ‘सकाळ’चे सहायक व्यवस्थापक (वितरण) अनंता रेनगडे, कृषी सहायक आय. के. अंभोरे, ‘ॲग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी सुरेश पाचकोर आदी उपस्थित होते.

Turmeric Production Guidance
Turmeric Cultivation : रिसोड भागात हळद लागवडीला प्रारंभ

ओळंबे म्हणाले, ‘‘हळद लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. माती परीक्षण करून घ्यावे. या भागातील तापमान वाढ लक्षात घेऊन २५ मे ते १४ जूनपर्यंत हळद लागवड करावी. दर्जेदार बेण्याची निवड तसेच रासायनिक तसेच जैविक घटकांची बेणे प्रक्रिया केल्यास कंदकुज तसेच करपा रोगास प्रतिबंध होतो.

गादी वाफ्यावर योग्य अंतर ठेवून लागवड केल्यास उत्पादकता वाढते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे सुलभ होते. सेंद्रिय खते, शेण खतांच्या वापरावर भर द्यावा. शिफारशीनुसार रासायनिक खतांच्या तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा द्याव्यात.’’

लोणाळे म्हणाले, ‘‘ हळदीच्या उत्पादन वाढीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर होणे आवश्यक आहे. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अंगीकार करावा.’’

कुलकर्णी म्हणाले, ‘‘देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी करण्यासाठी दर्जेदार ठिबक संच बसवावा.’’ ‘ॲग्रोवन’चे जिल्हा बातमीदार माणिक रासवे यांनी सूत्रसंचालन केले. भास्कर चव्हाण यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com