Safflower Cultivation
Safflower Cultivation  Agrowon
ताज्या बातम्या

Safflower Sowing : करडईचा दोन हजार हेक्टरवर पेरा

Team Agrowon

Safflower Sowing पुणे : तेलबिया (Oilseed) म्हणून ओळख असलेल्या करडई पिकांकडे (Safflower Crop) शेतकरी हळूहळू वळत आहे. यंदा रब्बी हंगामात करडई पिकाची सरासरीच्या दोन हजार ४१६ हेक्टरपैकी २ हजार ८३ हेक्टरवर पेरणी (Sowing) झाली आहे. सरासरी ८६ टक्के पेरणी झाली आहे.

गेल्या वर्षी एक हजार २६२ हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ८२१ हेक्टरने वाढ झाली आहे. सध्या पिकांची अवस्था चांगली असली तरी अनेक ठिकाणी पिके काढणीस तयार होत आहे.

येत्या दहा ते पंधरा दिवसांनंतर या पिकांची काढणी सुरू होईल, अशी शक्यता आहे. यंदा थंडी असल्याने पिके जोमदार आली होती. प्रामुख्याने चार महिने कालावधी असलेल्या करडईची अनेकांनी नोव्हेबर पेरणी केली होती. त्यामुळे येत्या काळात त्याची काढणी सुरू होणार आहे.

त्यातच अधूनमधून बदललेल्या हवामानामुळे काही प्रमाणात मावा, तुडतुडे या किडीचाही पिकांवर प्रादुर्भाव झाला होता. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या एक ते दोन वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तेलबियाविषयी चांगलीच जनजागृती केली जात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. जिल्ह्यात करडईचे सरासरी २३ हेक्टर क्षेत्र आहे.

त्यापैकी २४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरी १०४४ टक्के पेरणी झाली आहे असून त्यापटीने वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात अवघे ४३ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यातुलनेत यंदा चांगली वाढ झाली होती. यंदा सर्वाधिक पेरणी ही एकट्या बारामती तालुक्यात झाली आहे.

या तालुक्यात २३३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. नगर जिल्ह्यातही नगर, कर्जत, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यात करडईची बऱ्यापैकी पेरणी झाली आहे.

गेल्या वर्षी ६६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा नगरमध्ये २६, कर्जत २०, पाथर्डी २६, जामखेड ४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही सोयाबीन विषयी महत्त्व वाढले आहे.

त्यामुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात करडईची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात एक हजार १५३ हेक्टरवर पेरणी झाली होती.

यंदा सर्वाधिक पेरणी ही मंगळवेढा तालुक्यात झाली असून सुमारे एक हजार २२१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ दक्षिण सोलापूर माढा या तालुक्यातही चांगली पेरणी झाली आहे.

करडई पिकांची झालेली पेरणी : हेक्टरमध्ये

जिल्हा -- सरासरी क्षेत्र -- पेरणी क्षेत्र -- टक्केवारी

नगर -- ३६१ -- ७६ -- २१

पुणे -- २३ -- २४० -- १०४४

सोलापूर -- २०३२ -- १७६७ -- ८७

एकूण -- २४१६ --२०८३ -- ८६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT