Safflower Sowing : करडईच्या क्षेत्रात साडेतीनशे हेक्टरने वाढ

यंदाच्या (२०२२) रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. १६) पर्यंत करडईची १ हजार २२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी (२०२१) च्या ८७१.६ हेक्टरच्या तुलनेत यंदा करडईच्या क्षेत्रात ३५१.४ हेक्टरने वाढ झाली आहे.
Safflower Cultivation
Safflower Cultivation Agrowon
Published on
Updated on

परभणी ः यंदाच्या (२०२२) रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. १६) पर्यंत करडईची (Safflower Sowing) १ हजार २२३ हेक्टरवर पेरणी (Sowing) झाली आहे. गतवर्षी (२०२१) च्या ८७१.६ हेक्टरच्या तुलनेत यंदा करडईच्या क्षेत्रात (Safflower Acreage) ३५१.४ हेक्टरने वाढ झाली आहे. परंतु सरासरीच्या ३ हजार ३७१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदाचे करडईचे क्षेत्र २ हजार १४८.७६ हेक्टरने कमीच आहे.

Safflower Cultivation
Safflower Sowing : मराठवाड्यात बावीस हजार हेक्टरवर करडई पेरणी

रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक असलेल्या करडईच्या परभणी जिल्ह्यातील क्षेत्र २० हजार हेक्टरहून अधिक होते. परंतु गेल्या काही वर्षांत विविध कारणांनी घट झाली आहे. गेल्या पाच वर्षांतील करडईचे सरासरी क्षेत्र ३ हजार ३७१ हेक्टर एवढे आहे.

यंदा परभणी, सेलू, मानवत, गंगाखेड चार तालुक्यांतील करडईचे क्षेत्र २०० हेक्टरपेक्षा अधिक आहे. परभणी तालुक्यातील क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत २४३ टक्के वाढ झाली आहे. परंतु जिंतूर, पाथरी, सोनपेठ, पालम तालुक्यांत मात्र करडईच्या क्षेत्रातील घट कायम आहे.

Safflower Cultivation
Safflower Sowing : मराठवाड्यात बावीस हजार हेक्टरवर करडई पेरणी

पूर्णा तालुक्यात करडईचा पेरा झाला नसल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे. यंदा जवसाची ११९ पैकी ३६.४० हेक्टर (३०.५९ टक्के), तिळाची ३३.६४ पैकी १२ हेक्टर (३५.६७ टक्के), सूर्यफुलाची २६.२० पैकी ९ हेक्टर (३५.३५ टक्के) पेरणी झाली आहे. एकूण गळितधान्यांची ३ हजार ६४४ पैकी १ हजार २८४ हेक्टरवर (३५.२६ टक्के) पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय करडई पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी १०० २४३ २४३

जिंतूर ३९४ ७५ १९.०१

सेलू ८७१ २२० २५.२४

मानवत २६६ २४६ ९२.३१

पाथरी २८४ ४७ १६.५१

सोनपेठ २९३ ४ १.३६

गंगाखेड ७०५ २९० ४१.१२

पालम २७५ ९८ ३५.६१

पूर्णा १८० ०० ००

हिंगोली ४५ ३ ६.६२

कळमनुरी ६७ ०० ००

वसमत १० १० १००

औंढानागनाथ १७ १० ५८.८२

सेनगाव ६६ ५१ ७७.२७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com