Sadabhau Khot Agrowon
ताज्या बातम्या

Sadabhau Khot : देशी दारूच्या क्वार्टर एवढी किंमत एक लिटर दुधाला द्या ; सदाभाऊ खोत यांची अजब मागणी

Cow Milk Rate : देशी दारूच्या क्वार्टरची किंमती इतका दर शेतकऱ्यांच्या दुधाला द्या, अशी अजब मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

Team Agrowon

Sadabhau Khot Latest News : देशी दारूच्या क्वार्टरची किंमती इतका दर शेतकऱ्यांच्या दुधाला द्या, अशी अजब मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे. गायीच्या दुधाला ७५ तर म्हशीच्या दुधाला १२५ रुपये प्रतिलिटर दर देण्याची मागणी खोत यांनी केली आहे. इंदापुर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी मेळावा पडला. यावेळी खोत यांनी ही मागणी केली आहे.

राज्यात सध्या दुधाचे खरेदीदर घसरले आहेत. दुधाला योग्य दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दुधाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या दूध दरासाठी खोत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

खोत म्हणाले की, २२ मे रोजी दूध दराच्या प्रश्नावरून पुण्यामध्ये रयत क्रांती संघटनेने यात्रा काढली होती. याप्रश्नी दुग्धविकास मंत्र्यांनी बैठकही बोलावली आहे. या बैठकीत दुधाच्या दरासंबंधित प्रश्न मांडणार असल्याचे खोत म्हणाले. देशी दारूच्या एका बाटलीची किंमत जेवढी आहे. तेवढे पैसे आम्हला नको. देशी दारूच्या एका क्वार्टरची किंमत ९० रुपये आहे. तेवढेच पैसे शेतकऱ्याच्या दुधाला द्या, असे खोत यावेळी म्हणाले.

म्हशीच्या दुधाला १२५ रुपये दराची मागणी

खोत म्हणाले की, सर्वसाधारणपणे गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर ७५ रुपये दर आणि म्हशीच्या प्रतिलिटर दुधासाठी १२५ रुपयांचा दर मिळाला पाहिजे. दुधाचे दर वाढविल्यामुळे महगाई वाढणार नाही. शेतकऱ्यांना जर भाव दिला तर निश्चितपणे महागाई कमी होईल. कारण ज्यांना महागाईची झळ बसते ती माणसं शेतीत काम करण्यासाठी येतात. त्यामुळे शेतकरी त्यांनाही दोन पैसे देईल.

दरम्यान, दूध दराबाबत शिंदे सरकार सकारात्मक निर्णय घेईल का, असा प्रश्न विचारल्यानंतर जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचे भविष्य उज्वल असेल, असेही खोत यावेळी म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावं. पण तुम्ही जर शेतकऱ्यांना झिडकारलं तर त्याच शेतकऱ्याच्या हातात बळी नांगर आहे, हे राज्यकर्त्यांनी कधीही विसरू नये, असेही खोत म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT