Milk Rate : दूध दर पाडण्याचे संघटित षडयंत्र हाणून पाडू

Dairy Industry : दूध उत्पादकांनो, ही घरात बसण्याची नाही तर संघर्ष करण्याची वेळ आहे. गावागावांत एकत्र येऊन दूध संकलन केंद्रावर अंदोलने करावी लागतील.
Milk Rate
Milk RateAgrowon
Published on
Updated on

Nagar News : गेल्या पंधरा दिवसांत दुधाचे दर पाच ते सहा रुपयांनी पाडण्यात आले आहेत. दूध दर पाडण्यासाठी खासगी दूध संघ एकत्र येतात, त्यांच्या संघटनेत चर्चा करतात व एखाद्या गोष्टीचा बावू करून संगनमताने दूध उत्पादकांची लूट करण्याच्या हेतूने दर पाडत असल्याचे अनेक वर्षांपासून पहायला मिळत आहे.

मात्र दूध दर पाडण्याचे संघटित षडयंत्र हाणून पाडू. राज्यात एकत्र येत दूध दराच्या प्रश्नावर पुन्हा एल्गार करणार असल्याचे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

डॉ. अजित नवले म्हणाले, की मध्यंतरी केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याच्या चर्चा सुरू केल्या. त्या प्रकारची पावले टाकली, संघटित विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेतला, मात्र अशा प्रकारचे केंद्र सरकारने पाऊल टाकल्याचा बावू करून सगळ्या दूध कंपन्या, खासगी दूध संघ एकत्र आले आणि दुधाचे दर महाराष्ट्रात पाडण्याचे पूर्ण षडयंत्र केले जात आहे.

Milk Rate
Milk Rate Hike in Jalgaon : जळगाव दूध संघाकडून बल्क कूलिंगच्या दूधदरात ३० टक्के वाढ

पुढील काळात हे दर अजून कमी होतील अशी चर्चाही हे लोक करत आहेत. मागील काळात किसान सभेने काढलेल्या अकोले ते लोणी लाँगमार्चच्या पार्श्वभूमीवर ‘येत्या काळात दुधाचे दर या कंपन्या, संघ संगनमत करून पंचवीस रुपयांपर्यंत आणतील, अशी शंका उपस्थित केली होती आणि आता त्याप्रमाणेच काम सुरू आहे. दूध उत्पादकांची संघटित लूट सुरू केली आहे.

Milk Rate
Cow Milk Rate : गाईच्या दूध दरात कपात सुरुच

दूध उत्पादकांनो, ही घरात बसण्याची नाही तर संघर्ष करण्याची वेळ आहे. गावागावांत एकत्र येऊन दूध संकलन केंद्रावर अंदोलने करावी लागतील. एकाच दिवशी सर्व महाराष्ट्रात अशी अंदोलन केली तरच त्याचा परिणाम दिसेल.

जशा दूध कंपन्या, खासगी संघ एकत्र येऊन दुधाचे दर पाडतात, तसे आता दूध उत्पादकांच्या संघटना, नेते यांच्याशी समन्वय करून दूध उत्पादकांचे हित जोपण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी राज्यात एल्गार केला जाईल, असे डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com