Rural Health Agrowon
ताज्या बातम्या

Rural Health : ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’पासून ग्रामीण भाग राहणार वंचित

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्याच्या तेरा तालुक्यांमध्ये १ मे पासून या दवाखान्यांना सुरुवात होणार आहे.

Team Agrowon

Nagpur News ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचा (Balasaheb Thackeray Aapla Davakha) राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्याच्या तेरा तालुक्यांमध्ये १ मे पासून या दवाखान्यांना सुरुवात होणार आहे. पण हे दवाखाने केवळ नगर परिषद क्षेत्रात सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना या सुविधेचा फायदा होणार नाही. (Rural Health News)

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यांसह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनेलवरील डायग्नोस्टिक केंद्रांद्वारे स्वस्त दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आहे. विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉली क्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

औषध खरेदीसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत १५ व्या वित्त आयोगाकडून ४० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. याशिवाय जिल्हा नियोजन समितीकडून दवाखान्यांना औषधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

नागपूर जिल्ह्याच्या तेराही तालुक्यांतील नगरपरिषदेच्या क्षेत्रात हे दवाखाने सुरू होतील. या ठिकाणी रुग्णांवर उपचारासाठी एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका, स्टाफ नर्स, अटेंडन्ट आदींची कंत्राटीपद्धतीने भरती करण्यात येणार आहे.
- डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

Paddy Nursery Update: भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका

Free Seed Distribution: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT