Rs 48 lakh relief fund allocated in Nashik district Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain : नाशिक जिल्ह्यात ४८ लाख रुपये मदत निधीचे वाटप

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने राज्य सरकारने ४८ लाख ४९ हजार रुपये मदत निधीचे वाटप केले.

Team Agrowon

नाशिक : जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने राज्य सरकारने ४८ लाख ४९ हजार रुपये मदत निधीचे वाटप केले. राज्यासाठी २८ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. अतिवृष्टीमध्ये (Heavy Rain) मालमत्तेचे नुकसान झालेल्यांना मदत निधी वितरणाचा निर्णय सरकारने सोमवारी (ता. १९) घेतला. जिल्ह्यासाठी जून, जुलै २०२२ मधील नुकसानीपोटी २५ लाख ४९ हजार, ऑगस्ट-सप्टेंबरसाठी २३ लाख असा एकूण ४८ लाख ४९ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.

सिन्नर येथे झालेल्या अतिवृष्टीनंतर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी पाहणी करून तत्काळ पंचनाम्यासह मदतीसाठी शासनस्तरावर यासाठी पाठपुरावा

केला होता. अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थितीमुळे मालमत्तेच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार निधी वितरित करण्यात आला आहे. नंतर जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत झालेल्या व होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता शासन ११ ऑगस्ट २०२१ अन्वये विहित करण्यात आलेल्या मदतीच्या वाढीव दराने मदत अनुज्ञेय करण्यात आल्याने वाढीव दराने मदत देणे आवश्यक आहे. तसेच ऑगस्ट ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचे प्रस्ताव संबंधित विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाल्यानुसार देण्यात आलेल्या निधीमध्ये वाढीव दराने व ऑगस्ट ते सप्टेंबर २०२२ या कालावधीतसाठी झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता मदत निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

यात मृत जनावरांसाठी मदत, पूर्णतः नष्ट, अंशतः पडझड झालेली कच्ची, पक्की घरे, झोपडी, गोठे यांसारख्या नुकसानीसाठी मदत व इतर अनुज्ञेय असलेला बाबींच्या नुकसानीकरिता बाधितांना वाढीव दराने मदतीचे वाटप करण्याकरिता या शासन निर्णयान्वये ७ कोटी २४ लाख ६६ हजार आणि ऑगस्ट ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मालमत्तेच्या नुकसानीकरिता २० कोटी ६९ लाख१८ हजार असा एकूण २७ लाख ८४ हजार रुपये इतका निधी यांच्यामार्फत विभागीय आयुक्त राज्यातील विविध अतिवृष्टिग्रस्त संबंधित जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

मंजूर निधीत पडझड झाली आहे किंवा ज्या घरांत, दुकानांत सामानाची नासधूस झाली आहे त्यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT