Mumbai Vegetable Market agrowon
ताज्या बातम्या

Mumbai Vegetable Market : पावसामुळे भाजीपाला मार्केटवर थेट परिणाम, तब्बल ९० हजार पालेभाज्या जुड्या फेकल्या

Team Agrowon

Maharashtra Rain : महाराष्ट्रात मागच्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. दरम्यान होणाऱ्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचबरोबर पावसामुळे सर्वाधिक फटका भाजीपाला बाजाराला बसत आहे.

याबाबत मुंबईसारख्या भाजीपाला मार्केटमध्ये किरकोळ खरेदीदारांनी अक्षरश: पाठ फिरवल्याने सुमारे ५५० टन भाजीपाला विक्रीविना पडला असल्याची माहिती समोर आली आहे. तर पावसाने जवळपास ८० ते ९० हजार पालेभाज्या जुड्या फेकून देण्यात आल्याची माहिती स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली.

सलग तीन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने एपीएमसीतील आवक घटली आहे. तसेच भाजीपाला विक्री झाला नस्लयाने तो तसाच पडून असल्याचे चित्र आहे. ४५० गाडीहून अधिक आवक भाजीपाला बाजारात झाली. मात्र गेल्या तीन दिवसांत खरेदीदार ४० टक्क्यांनी घटला. त्यामुळे बाजारात आलेला भाजीपाला तसाच पडून होता.

त्यात गुरुवारी सकाळपासून ग्राहक नसल्याने दोन दिवसांचा माल आणि गुरुवारी झालेली आवक यामुळे ५५० टन भाजीपाला व्यापाऱ्यांच्या गाळ्यांत पडून राहिला. साडेपाच लाख पालेभाज्यांच्या जुड्यांची आवक झाली. पावसामुळे पालेभाज्या गाडीतच सडल्याने सुमारे ३५ टक्के म्हणजे ९० हजारांहून अधिका जुड्या फेकून

देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली. शिवाय पावसामुळे भाज्यांचे दरही २० ते २५ टक्क्यांनी घसरले. मात्र हे दर पुन्हा वाढण्याची शक्यता व्यापारी शंकर पिंगळे यांनी वर्तवली आहे.

टोमॅटोच्या दरावर परिणाम नाही

टोमॅटोच्या दरात घाऊक बाजारात कुठलाच बदल झाला नाही. टोमॅटोचे दर ९० ते १०० रुपये किलो होते. तर किरकोळ बाजारात १४० रुपये किलो होते. पालेभाज्यांच्या जुड्या ८ ते १० रुपये घाउकला तर किरकोळला २० रुपये जुडी होती.

इतर भाजीपाला २५ ते ४० रुपये किलो किरकोळ बाजारात दर होते. पावसामुळे दर घसरले असून ते दर दोन दिवसात पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा वाढतील असे ही व्यापाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी ४५० गाड्यांची आवक झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

SCROLL FOR NEXT