Amravati News: दुर्गम आदिवासी क्षेत्रात सुरु करण्यात आलेली शासकीय मका खरेदी केंद्र मला पहा आणि फुले वहा याच पठडीतील ठरली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आदिवासी विकास महामंडळा अंतर्गंत या केंद्राची सुरुवात झाली. परंतु सातबारा ऑनलाइन करण्यात येत असलेल्या अडचणींमुळे १५ दिवसाच्या कालावधीत एक क्विंटलही खरेदी झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. .केंद्र शासनाने मक्यासाठी २४०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. केंद्र सरकारने इथेनॉल धोरणात केलेल्या बदलाच्या परिणामी खुल्या बाजारात तेजीत असलेल्या मक्याचे दरात मात्र घसरण होत ते १४०० ते १८०० रुपये क्विंटलवर आले आहेत. त्यामुळे हमीभावाच्या तुलनेत ८०० ते १००० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. त्यामुळेच आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून मक्याची हमीभावाने खरेदी करण्यात यावी, अशी मागणी होती..Maize Crop Loss: सलग पावसामुळे मक्याचा चारा कुजला.त्यानुसार, दुर्गम मेळघाटातील आदिवासीबहूल गावांमध्ये खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. त्यामध्ये चिखलदरा तालुक्यातील चुरणी व गौळखेडा बाजार या गावातील केंद्रांचा समावेश आहे. भाजप आमदार तसेच आदिवासी विकास विभागाचे अध्यक्ष केवलराम काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सोहळ्यात तीन नोव्हेंबरला या केंद्रांचे रितसर उद्घाटन झाले. खरेदी केंद्राच्या औपचारिक उद्घाटनाला आज १५ दिवसांचा कालावधी लोटला असताना देखील या केंद्रावर एक पोते मक्याची खरेदी झालेली नाही..Maize Crop Damage: बुलडाण्यात पावसाचा मका पिकाला तडाखा.नोंदणीच पुढे सरकेनाशेतमालाच्या हमीभावाने खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते. त्याकरिता संबंधित पोर्टलवर ऑनलाइन सातबारा असावा, असा नियम आहे. मात्र सातबाऱ्याची ऑनलाइन नोंद घेण्याची प्रक्रियाच पुढे सरकत नसल्याने खरेदी रखडल्याचे सांगितले जाते. नोंदणीनंतरच हमीभावाने खरेदीची प्रक्रिया सुरु होणे शक्य होईल..गौळखेडा येथील केंद्रावर ४५ तर चुरणी येथील केंद्रावर सहा शेतकरी सातबारा, आधार कार्ड व पासबुक घेऊन नोंदणीसाठी आले होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे एकाही शेतकऱ्याची नोंदणी झाली नाही. तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जी. आर. साखरे, व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, धारणी, अमरावती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.