River Pollution Agrowon
ताज्या बातम्या

River Pollution : आता प्रदूषणविरहित नद्यांसाठी ‘रोडमॅप’

नद्यांना नवसंजीवनी मिळावी यासाठी ‘चला जाणू या नदीला’ अभियानाची सुरुवात करण्यात आली.

Team Agrowon

ठाणे : ठाणे, मुंबईतील बहुतांश नद्या या अतिक्रमणांच्या व प्रदूषणाच्या (River Pollution) विळख्यात अडकल्या आहेत. या नद्यांना नवसंजीवनी मिळावी यासाठी ‘चला जाणूया नदीला’ अभियानाची (Chala Januya Nadila Campaign) सुरुवात करण्यात आली. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील भातसा, उल्हास, वालधुनी या नद्यांसह त्यांच्या खोऱ्यातील कुंभेरी, कामवारी, भारंगी, कनकवीरा, चोर नदी, लेणाड नदी, कुशीवली या नद्यांची निवड करण्यात आली आहे.

या अभियानात नद्यांना भेडसावणाऱ्या ‍या समस्यांचा अभ्यास करून लोकसहभागातून त्या पुनर्जीवित करण्यासाठी कशाप्रकारे अतिक्रमण व प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आता रोड मॅप तयार करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्याला खळखळून वाहणाऱ्या नद्यांचे वरदान मिळाले आहे. पर्जन्यमान उत्तम असल्यामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांच्या जीवावर धरणेही बांधण्यात आली आहेत. म्हणूनच ठाण्याला धरणांचा जिल्हा असे म्हटले जाते.

मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये सांडपाणी, प्रदूषित पाण्यामुळे नद्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच अतिक्रमणामुळे अनेक नद्यांचे पात्र छोटे झाले आहे. म्हणूनच स्वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्सवानिमित्त हाती घेतलेल्या ‘चला जाणू या नदीला’ या उपक्रमासाठी ठाणे जिल्ह्यातील नद्यांची निवड करण्यात आली आहे.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची पहिली जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ‘चला जाणू या नदीला’ या अभियानामध्ये जिल्ह्यातील भातसा, उल्हास, वालधुनी, कुंभेरी, कामवारी, भारंगी, कनकवीरा, चोर नदी, लेणाड नदी या नद्यांचा समावेश आहे.

नदी स्वच्छतेतून गावाचा विकास

अभियानाच्या समन्वयक स्नेहल दोंदे यांनी जिल्ह्यातील नद्यांच्या संदर्भातील सद्यस्थितीचे सादरीकरण केले व अभियानात कशाप्रकारे काम अपेक्षित आहे याची माहिती दिली. नदी स्वच्छतेतून गावाचा विकास करण्याचे ध्येय ठेवून हे अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

SCROLL FOR NEXT