Tansa River  Agrowon
ताज्या बातम्या

Tansa River : तानसा नदी कोरडीठाक

Water Shortage : वाडा तालुक्यात बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, पिंजाळ, गारगावी, देहर्जे व तानसा अशा नद्या आहेत.

Team Agrowon

Wada News : वाडा तालुक्यात बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, पिंजाळ, गारगावी, देहर्जे व तानसा अशा नद्या आहेत. मात्र, नियोजनाअभावी यातील काही नद्या कोरड्याठाक पडतात. तानसा नदीवर बंधारे नसल्याने ती मार्चअखेरपर्यंत कोरडी पडते. त्यामुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. नदी कोरडी पडल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

वाडा तालुक्यात १७० गावे व २५० हून अधिक पाडे आहेत. तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. तालुक्यात औद्योगिकीकरणाचा ओढा वाहत आहे. त्यामुळे लोकसंख्येतही वाढ होत आहे. मात्र, त्यामानाने पाणी पुरवठा होत नाही. औद्योगिकीकरणामुळे रोलिंग मिल शितपेये कारखाने आले आहेत. या कंपन्यांना पाण्याची मोठी गरज असल्याने पाण्याचा मोठा उपसा होत असतो.

त्यासाठी खासगी कूपनलिका टॅंकरने पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे पाण्याची पातळी खोल गेल्याचे दिसून येत आहे. पूर्वी २०० ते २५० फुटांवर पाणी लागायचे आता ५०० फुटांपर्यंत कूपनलिका मारावी लागते.

येथील काही कंपन्यांना दररोज लाखो लिटर पाणी लागते. सरकारने येथील पाण्यात वाटेकरी निर्माण केले; मात्र त्याचे नियोजन किंवा साधने उपलब्ध १५ ते २० वर्षांत केली नाहीत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

तालुक्यात वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगावी या नद्यांवर काही ठराविक भागात बारमाही पाणी असते. या नद्यांवर काही किमी अंतरावर बंधारे असल्याने येथे बारमाही पाणी असते; मात्र तानसा नदीवर बंधारे नसल्याने किंवा बांधलेले बंधारे फोल ठरल्याने ही नदी मार्च अखेरपर्यंत आटते.

कोरडीठाक पडते. त्यातील अपवाद वगळता काही बंधारे निकृष्ट दर्जाचे झाल्याने किंवा बंधारे जिथे गरजेचे आहेत तिथे न घेतल्याने फेब्रुवारी अखेरपर्यंत पाणी शिल्लक राहत नाही. त्यामुळे तानसा नदी कोरडी ठाक पडलेली आहे.

तानसा नदीवर बंधारे नसल्याने पाणी फेबुवारीला संपते आणि नदी कोरडीठाक पडते. या नदीवर आता अनेक गावांनी पाणी पुरवठा योजना केल्या आहेत. अशीच नदी कोरडीठाक पडली, तर पाणी योजनाही अडचणीत येतील.
- विशाल पाटील, सदस्य, ग्रामपंचायत घोणसई मेट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr. Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे ८३ व्या वर्षी निधन

Rabi Jowar Sowing: मराठवाड्यात पाच लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी

Brinjal Market: वर्षभर विविध वाणांच्या वांग्याला मागणी

Guava Farming: पेरू उत्पादनातून साधला हमखास उत्पन्नाचा मेळ

Maharashtra Voter Issue: मतदारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा

SCROLL FOR NEXT