Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यात रब्बी ज्वारीचा अपेक्षित पेरा झालाच नसल्याची स्थिती आहे. आठवी जिल्ह्यात सर्वसाधारण सहा लाख ११ हजार ४२१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात ५ लाख ५४ हजार ५८७ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे..पेरणी झालेल्या या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय अंतर्गत येत असलेल्या तीन जिल्ह्यांतील २ लाख २० हजार ९९४ हेक्टर क्षेत्रासह लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यातील ३ लाख ३३ हजार ५९२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.छत्रपती संभाजीनगर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय अंतर्गत तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८०.५२ टक्के क्षेत्रावर तर लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय अंतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांत सर्व साधारण क्षेत्राच्या तुलनेत ९९ टक्के टक्के क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे..Jowar Sowing: ज्वारीचा आतापर्यंत साडेनऊ लाख हेक्टरवर पेरा.ज्वारी क्षेत्रात घट...मराठवाड्यातील धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ज्वारीची पेरणी कमी झाली आहे. दुसरीकडे बीड, लातूर, नांदेड व हिंगोली या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन ज्वारीच्या पेरणीला पसंती दिली आहे..Rabi Jowar Sowing: पुणे विभागात अवघी ४२ टक्के ज्वारी पेरणी.यंदा क्षेत्र घटीची पुढे आलेली कारणे...अति पावसामुळे पेरणीचा कालावधी पुढे ढकललाकाढणी व मळणीची प्रक्रिया किचकटमजुराची अडचणएकट्याने पेरणी करणे नुकसानीचेइतर नगदी पिकाच्या तुलनेत दराचा प्रश्न.पौष्टिक अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी किमान आपल्या कुटुंबापुरते ज्वारीची उत्पादन घेणे आवश्यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ज्वारीच्या चांगल्या सुधारित वाणांची निर्मिती केली आहे. त्यामुळे पिकाचा फेरपालट करण्यासोबतच शेतकऱ्यांनी ज्वारीला प्राधान्य देणे आवश्यक आहे.- डॉ सूर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.