Onion Rate agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार, केंद्राने घेतला मोठा निर्णय

Onion Price : टोमॅटोपाठोपाठ कांद्याचे दरात मोठी वाढ होण्याची शक्यता केंद्राकडून व्यक्त करण्यात येत असल्याने सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Team Agrowon

Onion Price News : टोमॅटोपाठोपाठ कांद्याचे दरात मोठी वाढ होण्याची शक्यता केंद्राकडून व्यक्त करण्यात येत असल्याने सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर सामान्यांचा खिसा गरम होण्यापासून वाचला आहे.

यंदा कांदा लागवडीला उशिर झाला आणि उन्हाळी कांद्याला अवकाळी आणि वादळी पावसाचा जोरदार फटका बसल्याने बाजारात दर्जेदार कांदा कमी येण्याची शक्यता आहे. यामुळे दर्जेदार कांद्याचे दर दुप्पट होण्याची भिती केंद्र सरकारला असल्याने सरकारकडून बफर स्टॉकमधून ३ लाख मेट्रिक टन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल, परंतु शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसेच ग्राहक व्यवहार विभागाने म्हटले आहे की, किरकोळ किमती जास्त असलेल्या राज्यांत बफर स्टॉकमधील कांदा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्याचा दर साधारण ५५ ते ६० रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

गेल्या चार वर्षांच्या तुलनेत केंद्र सरकारकडील कांद्याच्या बफर स्टॉकचा आकार तिप्पट झाला आहे. २०२०-२१ मध्ये केंद्राकडील कांद्याचा बफर स्टॉक १ लाख मेट्रिक टन होता. तो २०२३-२४ मध्ये ३ लाख मेट्रिक टन इतका झाला आहे.

केंद्राकडील कांद्याचा बफर स्टॉक ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आणि किमतीची स्थिरता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे ग्राहक व्यवहार विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT