Waterfalls In Kolhapur : कोल्हापुरातील धबधब्यांवर जाण्याची बंदी उठवली, विकेंडला करा प्लॅन

sandeep Shirguppe

जिल्ह्यातील धबधबे प्रवाहीत

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहेत. तर जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाल्याने पर्यटक आनंद घेण्यासाठी जात आहे.

Waterfalls In Kolhapur | agrowon

कोल्हापुरातील पाऊस थांबला

मागच्या काही दिवसांपूर्वी होत असलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांच्या तहसीलदारांकडून धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती.

Waterfalls In Kolhapur | agrowon

धबधब्यावरील बंदी उठवली

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, आजरा तालुक्यातील अनेक ठिकाणी असलेले धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी उठवण्यात आली आहे.

Waterfalls In Kolhapur | agrowon

शाहूवाडी तालुक्यातील धबधबे

शाहूवाडी तालुक्यातील बर्की, माण पालेश्वर, पावनखिंड, मानोली परिसरातील धबधबे प्रवाहीत झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

Waterfalls In Kolhapur | agrowon

तहसिलदारांकडून परवानगी

दरम्यान शाहूवाडी तालुक्यातील धबधब्यांवर जाण्यास परवानगी दिल्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे कळवले.

Waterfalls In Kolhapur | agrowon

सर्व मार्ग खुले

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे रस्ते, बंधारे, पूल पाण्याखाली गेले होते. त्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी जाण्यासाठी बंदी घातली होती.

Waterfalls In Kolhapur | agrowon

राधानगरी तालुक्यातील धबधबे प्रवाहीत

राधानगरी तालुक्यातही तोरस्करवाडी, राऊतवाडी यासह अनेक छोटे मोठे धबधबे प्रवाहीत झाले आहेत.

Waterfalls In Kolhapur | agrowon

चंदगडमध्ये तिलारी धरण भरले

आजरा, चंदगड तालुक्यातील तिलारी तसेच जंगमहट्टी ही धरणे भरल्याने त्या भागात असणारे धबधबे ओसांडून वाहत आहेत.

Waterfalls In Kolhapur | agrowon

बर्की धबधबा

शाहूवाडी तालुक्यात बर्की धबधबा आणि धरण परिसर माण पालेश्वर तलाव पावनखिंड येथील वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे समाधीस्थळ आहे.

Waterfalls In Kolhapur | agrowon

मानोली धबधबा

मानोली धबधबा, कांडवण धरण व सांडव्याचा परिसर, उखळू धबधब्याचा तुम्हाला आनंद घेता येतो.

Waterfalls In Kolhapur | agrowon
Kas pathar | Agrowon
आणखी पाहा...