Abdul Sattar Agrowon
ताज्या बातम्या

कृषी विद्यापीठातील मजुरांचा प्रश्‍न सोडवा

कृषी विद्यापीठामध्ये राबणाऱ्या रोजंदारी मजुरांना काढून टाकत संस्थांच्या माध्यमातून मजुरांची सेवा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टीम ॲग्रोवन

अमरावती : कृषी विद्यापीठामध्ये राबणाऱ्या रोजंदारी मजुरांना काढून टाकत संस्थांच्या माध्यमातून मजुरांची सेवा (Labour Service) घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कृषी विद्यापीठातील (Agriculture University) कामकाज प्रभावित होणार असल्याने या संदर्भातील आदेश मागे घेण्यात यावा व नियमित मजुरांची नियुक्ती करावी, अशी मागणी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले (Dr. Vilas Bhale) यांनी केली आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना शनिवारी (ता. २०) शासकीय विश्रामगृहावर दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली. निवेदनानुसार, कृषी विद्यापीठामध्ये सद्यःस्थितीत नियमित आस्थापनेवरील ८६० मजुरांची पदे मंजूर आहेत. त्यातील ६५० मजुरांची पदे ही रिक्त आहेत. रोजंदारी मजुरांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार ही पदे भरण्याचे अधिकार विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत आहेत.

या नियमानुसार विद्यापीठाला ६५० पदे भरण्याची परवानगी मिळाल्यास विद्यापीठातील मजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्‍न निकाली निघणार आहे. तसेच सदर पदे ही शासनाच्या नियमित आस्थापनेवरील असल्याने शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा देखील पडणार नाही. त्यामुळे कृषfमंत्री म्हणून आपल्या स्तरावर या संदर्भात निर्देश देण्यात यावे व रोजंदारी मजुरांचा प्रश्‍न निकाली काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Moisture: दुष्काळाच्या परिस्थितीत मातीतील ओलावा कसा टिकवावा?

Crop Damage Inspection : नुकसानग्रस्त सोयाबीन, कापूस पिकांची पाहणी

Farmers Issue: नांदेडचे दोन तालुके वगळल्याने शेतकऱ्यांत तीव्र संताप

Water Testing Delay : पाण्याच्या चाचण्या अडकल्या प्रशासकीय दिरंगाईत

Grape Pruning: रोगमुक्त द्राक्षछाटणी कशी करावी?

SCROLL FOR NEXT