Reshamandi Agrowon
ताज्या बातम्या

नैसर्गिक धाग्यांची परिसंस्था ‘रेशामंडी’ जागतिक बाजारपेठेत

‘फार्म-टू-फॅशन’ असे ब्रीद घेऊन नैसर्गिक धाग्यांची डिजिटल परिसंस्था असलेली रेशामंडी ही कंपनी जागतिक बाजारपेठेत प्रवेश करत असून, नैसर्गिक आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या कापडांसाठी वन-स्टॉप सोर्सिंग सोल्यूशन बनण्याचे तिचे उद्दिष्ट आहे,

टीम ॲग्रोवन

मुंबई : ‘फार्म-टू-फॅशन’ असे ब्रीद घेऊन नैसर्गिक धाग्यांची डिजिटल परिसंस्था असलेली रेशामंडी (Reshamandi) ही कंपनी जागतिक बाजारपेठेत प्रवेश करत असून, नैसर्गिक आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या कापडांसाठी वन-स्टॉप सोर्सिंग सोल्यूशन बनण्याचे तिचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती ‘रेशामंडी’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक तिवारी यांनी दिली.

तिवारी म्हणाले, ‘कापड, तयार कपडे आणि होम फर्निशिंग्ज यांतील ५०० हून अधिक घरगुती उत्पादकांना रेशामंडीने एक कोटीहून अधिक मीटर इतके नैसर्गिक धाग्यांचे कापड पुरविले आहे. या ५०० जणांपैकी, २००हून अधिक जण निर्यातदार आहेत. ते सर्व सुप्रसिद्ध ब्रँड्सना आपली उत्पादने पुरवीत असतात. कपडे आणि होम फर्निशिंग्ज यांमध्ये कापड हे मूलभूत साहित्य असल्याने, या कापडाच्या माध्यमातून रेशामंडीकडून सध्या देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेत विविध प्रकारच्या उत्पादकांना पुरवठा होतो.

यामध्ये रेशीम, कापूस, व्हिस्कोस, बांबू, ताग आणि इतर नैसर्गिक धाग्यांचा समावेश होतो. दूध, सोया आणि इतर अशा नैसर्गिक स्रोतांपासून उत्पादित केलेल्या कापडांची देखील रेशामंडी विक्री करते. नैसर्गिक धाग्यांच्या पुरवठा साखळीसाठीच्या आमच्या ‘गेम-चेंजिंग फूल-स्टॅक इकोसिस्टीम’मुळे रोजगारनिर्मिती होत आहे.

जागतिक बाजारपेठेतील प्रवेश करून आम्ही वस्त्रोद्योगातील सर्वांत मोठा नैसर्गिक धाग्यांचा पुरवठादार बनू शकतो, त्याचप्रमाणे कपडे, जीवनशैली, होम फर्निशिंग, फॅब्रिक्स आणि इतर श्रेणींमध्ये शाश्‍वत उपाय शोधणाऱ्यांना सेवा देऊ शकतो. या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती वाढ करण्यात यशस्वी होऊ.’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate : देशात सोयाबीनचे दर वाढण्याचे संकेत

Maharashtra Rains : राज्यातील काही भागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर; २४ तासांत १० जणांचा मृत्यू, जाणून घ्या कुठे कुठे पाऊस?

Bhima River Crisis : भीमेचे अश्रू

Palm Cultivation : बांबूसोबत पाम लागवडीचा पर्याय विचाराधीन

Farmer Flood Relief : सरकारने वेळकाढूपणा करू नये

SCROLL FOR NEXT