aadhar link Agrowon
ताज्या बातम्या

Aadhar Updating : ३० लाख आधार कार्डाचे नूतनीकरण काम बाकी

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डाचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यात ३० लाख आधार कार्डांचे नूतनीकरणाचे काम शिल्लक असल्याची माहिती डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

Team Agrowon

Pune News भोर : शासकीय योजनांचा (Government Scheme) लाभ घेण्यासाठी आधार कार्डाचे नूतनीकरण (Aadhar Updating) करणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यात ३० लाख आधार कार्डांचे नूतनीकरणाचे काम शिल्लक असल्याची माहिती डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची’ या अभियानाचा प्रारंभ जिल्हाधिकारी देशमुख यांच्या हस्ते शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, नायब तहसीलदार मनोहर पाटील, भोर एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गुजर, सचिव गजानन झगडे, सरपंच प्रवीण जगदाळे, प्राचार्य संजय कडू, कल्पना खंडाळे, विष्णू अवघडे, ग्रामसेवक पद्माकर डोंबाळे आदी उपस्थित होते. तसेच विविध शासकीय योजनांच्या दाखल्यांचे वाटप या वेळी करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख पुढे म्हणाले, की जिल्ह्यात पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणण्याच्या मोहिमेचा गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भोर तालुक्यात प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेत तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध कामकाज करून पोटखराबाचे ६० हजार एकर क्षेत्र लागवडी योग्य केले आहे.

तसेच तालुक्यात पोटखराबाचे शेरे कमी करून सातबारा वाटप या मोहिमेअंतर्गत करण्यात आले. भोर विभागाने या मोहिमेत उत्तम काम केले असून, जिल्ह्यातील इतर तालुक्यात भोर प्रशासनाचे काम अनुकरणीय आहे. ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची’ अभियानाच्या अनुषंगाने भोर प्रशासनाने पुढील दोन महिन्यांत तालुक्यातील प्रत्येक घरात शासनांच्या प्रत्येक विभागाच्या योजना पोहोचवून लाभ देण्याचे नियोजन केले आहे.

आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेश प्रकियेच्या वेळी होणारी अडचण कमी करण्याच्या दृष्टीने उन्हाळी सुट्ट्यामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, त्यांचा लाभ नागरिकांसह विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Article: शेती सुखाची करणे शक्य आहे का?

Mango Management: वाढीच्या अवस्थेत आंबा बागेचे व्यवस्थापन आणि जुन्या झाडांचे पुनरुज्जीवन कसे करावे?

Agrowon Diwali Article: संघर्षातून बहरली समाधानी आयुष्याची बाग

Sugarcane Crushing Season: गाळप हंगामासाठी नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांचे अर्ज

Agrowon Diwali Article: सर्वांगीण उन्नती साधणारी राजपुतांची शेतीसंस्कृती

SCROLL FOR NEXT