Araphal Canal Agrowon
ताज्या बातम्या

Water Crisis : आरफळच्या पाण्यामुळे तासगावात दिलासा

Sangli Water crisis : सांगली जिल्ह्यातील पाण्याची टंचाई कमी करण्यासाठी आरफळ कालव्यातून आवर्तन सुरू असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

Sangli News : तासगाव तालुक्यात यंदा दुष्काळाचे संकट घोंघावू लागले आहे. खरीप तर गेलाच, आता रब्बीसाठी तरी पाऊस पडणार की नाही, हा प्रश्न आहे. पावसाने ४० टक्क्यांचीही सरासरी गाठलेली नाही. तलाव कोरडे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. पाण्याची टंचाई कमी करण्यासाठी आरफळ कालव्यातून आवर्तन सुरू असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेली तीन महिने पावसाने ओढ दिल्याने २००३ मधील दुष्काळाच्या आठवणी जाग्या झाल्यात. संपूर्ण ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. सप्टेंबर सुरू झाला तरी पावसाची चिन्हे नाहीत. खरीप पेरण्या झालेल्या नाहीत, ज्या झाल्या त्या वाया गेल्यात. आता रब्बीची आशा आहे. मात्र पावसाचा अंदाज यायला तयार नाही. ग्रामीण भागात माळरानावर गवतही न उगवल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे.

यंदा पावसाने सुरवातीपासूनच ओढ दिली आहे. तीन महिन्यांत केवळ १२५ मिमीची नोंद आहे. रब्बीसाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे. चालू महिन्यात दहा तारखेनंतर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही दिवसांनी द्राक्ष छाटण्या सुरू होतील, त्या वेळी बागांना पाण्याची आवश्यकता भारणार आहे. पाऊस न पडल्यास शेतीचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT