Ujani Dam Agrowon
ताज्या बातम्या

Rain : धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती

जून महिन्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे धरणांतील पाण्याने चांगलाच तळ गाठला होता.

टीम ॲग्रोवन

पुणे : पावसाचे दोन महिने उलटले असून, या काळात चांगला पाऊस (Good Rain) झाला. आता श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain In Isolated Places) झाला. परंतु पावसाला जोर नसला तरी मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती (Relaxation In Rain) घेतली आहे. विशेष म्हणजे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने चांगलीच उघडीप दिल्यामुळे धरणातील पाण्याच्या आवकेत (Arrival In Dam Water) चांगलीच घट झाली आहे.

जून महिन्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे धरणांतील पाण्याने चांगलाच तळ गाठला होता. जुलै महिन्यात पाऊस झाला नसता तर पाण्याची चांगलीच टंचाई सुरू होण्याच्या धास्तीने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती. परंतु जूनच्या अखेरीस पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले. त्यानंतर पावसाचा जोर वाढ गेला. सात जुलैपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता.

धरणक्षेत्रासह मुळशी, ठोकरवाडी, वळवण, शिरोटा, लोणावळा या घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसामुळे भात खाचरे तुडूंब भरली असून धरणांतील पाण्याच्या आवकेत वाढ होत गेली. त्यामुळे धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढली.

सध्या जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये जवळपास १५५.५९ टीएमसी एवढी उपयुक्त पाण्याची आवक झाली झाली आहे. तर, मृतसाठ्यासह धरणांत १८५.१० टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे.

सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक भागांत कडक ऊन पडत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. सोमवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत वळवण आणि लोणावळा या घाटमाथ्यावर तुरळक पाऊस पडल्याची नोंद झाली असली तरी उर्वरित भागात कुठेही पाऊस पडला नाही. उन्हामुळे शेतात वाफसा स्थिती येत असल्याने पिकांना चांगलाच दिलासा मिळत आहे. पश्चिम पट्ट्यातील धरणांमध्ये आवकेत घट झाल्याने पाण्याच्या विसर्गातही घट करण्यात आली आहे.

एक जून ते १ ऑगस्टपर्यंत झालेला धरणाच्या पाणलोट क्षेत्रनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) टेमघर १,८१४, वरसगाव १,४२५, पानशेत १,४५८, खडकवासला ४२०, पवना १,५८१, कासारसाई ५९८, कळमोडी १,०८२, चासकमान ५७०, भामा आसखेड ६०२, आंध्रा ७७५, वडिवळे १,५७१, शेटफळ २६४, नाझरे २५१, गुंजवणी १,३६३, भाटघर ५३८, नीरा देवघर १,२१६, वीर २२४, पिंपळगाव जोगे ७३३, माणिकडोह ८७६, येडगाव ५२६, वडज ४५७, डिंभे ७४५, चिल्हेवाडी ४२५, घोड १६२, विसापूर ८२, उजनी ३३१, मुळशी ३,७९१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सिताफळाची आवक वाढली; आवळ्याला कमी उठाव, हिरवी मिरची नरमली, लिंबुचे दर टिकून, लसणाचे दर स्थिर

Leopard Attack : निमगावात बिबट्याचा घोड्याच्या शिंगरूवर हल्ला

Dam Water Discharge : वाघूर, गिरणातून विसर्ग

Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात १.३३ लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा

Rain Damage Jalgaon : पावसाने जळगाव जिल्ह्यात हानी

SCROLL FOR NEXT