Agriculture Land Agrowon
ताज्या बातम्या

Tukda Bandi Kayada : जमीन तुकडा बंदी कायद्यांतर्गत क्षेत्राच्या अटीत शासनाकडून शिथिलता

Agriculture Land : काही गावांमध्ये गटस्कीम लागू नाही तिथे तुकडे बंदी कायदा लागू होत नसल्याचे समजते. त्या ठिकाणीही खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबलेले आहेत.

Team Agrowon

Nashik News : जमीन तुकडा बंदी कायद्यामध्ये शिथिलता आणून जिल्ह्यातील जिरायती क्षेत्रासाठी २० गुंठे, तर बागायती क्षेत्रासाठी १० गुंठ्यांपर्यंत खरेदी-विक्रीसाठी शासनाकडून राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून परवानगी दिली असल्याची माहिती निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी दिली आहे.

राज्य शासनाने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम २०१५ अन्वये तुकडा बंदी कायदा महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागाने १२ जुलै २०२१ रोजी परिपत्रक काढून अंमलात आणला आहे. त्यामुळे बागायती क्षेत्रासाठी २० गुंठे क्षेत्रापेक्षा कमी व जिरायती क्षेत्रासाठी ८० गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्राची खरेदी-विक्री होत नसल्याने त्या अंतर्गत होणारे संपूर्ण व्यवहार ठप्प झालेले आहेत.

काही गावांमध्ये गटस्कीम लागू नाही तिथे तुकडे बंदी कायदा लागू होत नसल्याचे समजते. त्या ठिकाणीही खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबलेले आहेत. अनेकदा शेतकरी रस्ता, विहीर, निवास आदींसाठी गुंठेनिहाय जमिनीची खरेदी-विक्री करतात.

परंतु या निर्णयामुळे असे शेतकरी देखील अडचणीत येत आहेत. तसेच एका कुटुंबांत जर २० आर क्षेत्र असून दोन भावांमध्ये त्याची समान वाटणी झाल्यानंतर दोन्ही भावांच्या नावावर प्रत्येकी १० आर क्षेत्र नावावर करण्यास देखील यामुळे अडचण येत होती.

पिंपळगाव बसवंत जॉईंट फार्मिंग सोसायटीचे शेतकरी बांधव पूर्वी एकत्रित शेती करीत होते. ज्या शेतकरी सभासदांनी त्यांची शेती संस्थेकडे भागधारकनिहाय दिलेली होती. त्या शेतकरी सभासदांना शेती भागनिहाय पुन्हा वाटप करावयाची आहे.

तुकडा बंदी कायद्यांतर्गत होणारे व्यवहार थांबलेले असून अनेक नागरिकांना रस्ता, विहीर, निवास आदी कारणांसाठी येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने याबाबत आमदार बनकर यांनी ही बाब निवेदनाद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.

त्यानुसार शासनाने राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून जमिनी तुकडा बंदी कायद्याच्या अटींमध्ये शिथिलता आणून नाशिक जिल्ह्यातील जिरायती क्षेत्रासाठी २० गुंठे, तर बागायती क्षेत्रासाठी १० गुंठ्यांपर्यंत खरेदी-विक्रीसाठी परवानगी दिल्याने शेतकऱ्यांना यामुळे निश्चितच दिलासा मिळणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बनकर यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यात शनिवार, रविवार पावसाचा जोर कमी राहणार

Farmers Market : शेतकरी बाजाराचा मुद्दा मागे पडला

Banana Procurement : कमी दरात केळीच्या खरेदीचा धडाका

Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्दचा शेतकरी आणि नागरिकांना काय फायदा मिळणार ?

Cotton Farming : कापूस उत्पादन वाढीसाठी मूलभूत टिप्स

SCROLL FOR NEXT