Mango  Agrowon
ताज्या बातम्या

Mango Export : आंबा निर्यातीसाठी नोंदणी आवश्‍यक

फळांचा राजा असलेल्या आंब्याला परदेशात चांगला दर मिळत असल्याने आपल्या बागेतील हापूस परदेशात जावा, यासाठी जिल्ह्यातील आंबा बागायतदार सरसावले आहेत. आंबा निर्यातीसाठी मँगोनेट योजना राबवली जात आहे.

टीम ॲग्रोवन

महाड : फळांचा राजा असलेल्या आंब्याला (Mango) परदेशात चांगला दर मिळत असल्याने आपल्या बागेतील हापूस (Hapus Export) परदेशात जावा, यासाठी जिल्ह्यातील आंबा बागायतदार सरसावले आहेत. आंबा निर्यातीसाठी (Mango Export) मँगोनेट योजना राबवली जात आहे.

या अंतर्गत रायगडमधून गतवर्षी १ हजार ९७२ निर्यातक्षम आंबाबागांची नोंदणी झाली असून २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत मँगोनेट ऑनलाईन प्रणालीवर नोंदणीचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यात करण्यासाठी कृषी आणि प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणच्या (अपेडा) मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबाबागांची नोंदणी केली जाते. आंबा निर्यात करणाऱ्या बागायतदारांना नोंदणी सोयीची व्हावी यासाठी मँगोनेट ही ऑनलाईन प्रणाली १ डिसेंबरपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी अपेडामार्फत फॉर्म रजिस्ट्रेशन मोबाईल अ‍ॅप उपलब्ध आहे.

निर्यात आंबा बागांची नोंदणी पाच वर्षांसाठी वैध असल्याने गतवर्षी नोंदणी केलेल्या आंबा बागांची नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. परंतु २०२२-२३ या वर्षासाठी नव्याने नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२, ८ अ, बागेचा नकाशा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. मँगोनेटद्वारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत आहे.

नियम पाळणे बंधनकारक

 जागतिक व्यापार संघटनेच्या प्रत्येक निर्यातदार देशांना स्वच्छतेविषयक व पिक स्वच्छतेविषयक नियम पाळणे सक्‍तीचे आहे.  मॅगोनेट प्रणालीमध्ये आंब्याच्या पूर्वइतिहास (ट्रेसेबिलीटी) उपलब्ध असल्याची खात्री देणे आवश्यक आहे. शेतकरी प्रशिक्षण, बागांची तपासणी, पीक संरक्षण अभिलेख ठेवणे आवश्यक आहे.

आंबा बागायतदारांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्याकरिता आपल्या कार्यक्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी साहायकाशी संपर्क साधून विहित मुदतीत नोंदणी करावी.
उज्ज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT