Crop Insurance Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance Scheme : सातारमध्ये पीक विमा योजनेत ९१ हजार ५०० शेतकऱ्यांची नोंदणी

Satara Crop Insurance : खरीप हंगाम २०२३ मध्ये या योजनेत शुक्रवारअखेर जिल्ह्यातील सुमारे ९१ हजार ५०० शेतक-यांनी सहभाग नोंदविला असून, योजना सुरु झाल्यापासूनचा हा उच्चांक आहे.

Team Agrowon

Satara News : खरीप हंगाम २०२३ मध्ये या योजनेत शुक्रवारअखेर जिल्ह्यातील सुमारे ९१ हजार ५०० शेतक-यांनी सहभाग नोंदविला असून, योजना सुरु झाल्यापासूनचा हा उच्चांक आहे. तथापी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी अजूनही या योजनेत सहभागी झाले नसल्याने त्यांनी दि ३१ जुलै पूर्वी या योजनेत सहभागी होणेचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इ. कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे स्थैर्य अबाधित राखणेसाठी शासनाने खरीप हंगाम २०२३ साठी पंतप्रधान फसल विमा योजना पुढे सुरु ठेवणेस मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय महसूल मंडलनिहाय पिके व क्षेत्र अधिसूचित केली असून त्याप्रमाणे भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व खरीप कांदा या नऊ पिकांसाठी जिल्ह्यामध्ये ही योजना लागू आहे.

या योजनेमध्ये सहभागी होणेसाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे. या योजनेचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे शेतक-यांनी फक्त एक रुपया विमा हप्ता रक्कम भरावयाची असून उर्वरित विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे. या योजनेंतर्गत संरक्षित रकमेची सांगड पिकाच्या आधारभूत किंमतीशी घातल्याने संरक्षित रकमेत वाढ झाली आहे, परंतु विमा हप्ता दर २ टक्के असूनही शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरुन योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे.

खरीप हंगाम २०२३ मध्ये या योजनेत शुक्रवारअखेर जिल्ह्यातील सुमारे ९१ हजार ५०० शेतक-यांनी सहभाग नोंदविला असून योजना सुरु झाल्यापासूनचा हा उच्चांक आहे. तथापि जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी अजूनही या योजनेत सहभागी झाले नसलेल्या शेतकऱ्यांनी ३१ जुलै पूर्वी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pink Bollworm : पूर्वमॉन्सून कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा हल्ला

Fodder Transport Ban: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील चारा बाहेर नेण्यास बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय

Maharashtra Drought : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४ तालुक्यांत दुष्काळ

Kolhapur Irrigation Federation: सहकारी पाणीपुरवठा संस्थांना मोफत वीज द्या

Agrowon Podcast: तूर बाजारात चढ-उतार, गवार दरात वाढ, बटाटा बाजारात आवक वाढली, हिरव्या मिरचीच्या दरात बदल तर पपईचे दर टिकून

SCROLL FOR NEXT