Market Bulletin: कापूस दरात सुधारणादेशातील बाजारात मागील ३ आठवड्यांपासून कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. सीसीआयनेही कापसाच्या भावात वाढ केली आहे. सीसीआयने मागील २ दिवसांमध्ये कापसाच्या भावात १८०० रुपयांची वाढ केली आहे. तर मार्च महिन्यात खंडीमागे ३७०० रुपयाने भाव वाढवले आहेत. तर खुल्या बाजारात कापसाला सध्या सरासरी ८ हजार १०० ते ८ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाची बाजारातील आवक कमीच आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कापसाच्या भावातील सुधारणा टिकून राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीन टिकूनदेशातील बाजारात सोयाबीनचे भाव मागील २ दिवसांपासून टिकून आहेत. सोयाबीनला सध्या चांगला उठाव आहे. तर बाजारातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. सोयाबीनच्या भावातील वाढही सध्या टिकून आहे. सोयाबीनला सध्या बाजारात सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनला तेल आणि सोयापेंडसाठी उठाव मिळत आहे. सोयाबीनची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सोयाबीनचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Maharashtra Sugar Quota: राज्याला ८.१६ लाख टन साखर विक्री कोटा.कांदा आवक सुधारली कांद्याची आवक मागील काही दिवसांपासून वाढलेली आहे. नुकतेच काही भागात पाऊस झाला. यामुळे शेतकरी कांदा बाजारात आणत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या बाजारात रब्बीच्या कांद्याची आवक सर्वच राज्यांमध्ये वाढत आहे. तर बाजारात कांद्याला मर्यादीत उठाव आहे. यामुळे बाजारभाववर दबाव आहे. सध्या बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १२०० रुपयांचा भाव मिळत आहे. कांद्याची बाजारातील आवक पुढील दोन महीने कायम राहून दरावर दबाव राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: मक्याचा भाव दबावातच; सोयाबीनमध्ये वाढ, कापसाला उठाव, गवार तेजीत, तर गव्हाची आवक वाढली .कारली टिकूनराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कारल्याची आवक वाढली आहे. याचा काहीसा दबाव कारल्याच्या भावावर दिसून येत आहे. असे असले तर आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही. यामुळे कारल्याचा भाव एका पातळीदरम्यान दिसून येत आहे. कारल्याला सधा प्रतिक्विंटल सरासरी २ हजार २०० ते २ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कारल्याला सध्या उठावही चांगला आहे. आवकेचा दबाव आणखी काही दिवस राहण्याचा अंदाज असून भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. .बाजरी टिकूनदेशात मागील काही दिवसांपासून बाजराची आवक स्थिरावली आहे. सध्या देशात बाजारीला गुणवत्ता आणि वाणानुसार प्रतिक्विंटल सरासरी २ हजार २०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशात यंदा बाजारीच्या उत्पादनाला काही भागात फटका बसल्याचे व्यापारी आणि शेतकरी सांगत आहेत. यामुळे बाजारातील रब्बी आणि उन्हाळी बाजरीची आवक येणार असली तरी एकूण पुरवठा वाढण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे बाजरीच्या भावाला आधार राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.