Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Fruit Crop Insurance : सांगलीत ६ हजार शेतकऱ्यांची फळपीक विम्यासाठी नोंदणी

Crop Insurance Scheme : हवामान आधारित फळपीक विमा योजनेत जिल्ह्यातील मृग बहरातील फळपिकासाठी ६ हजार ४५५ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

Team Agrowon

Sangli News : हवामान आधारित फळपीक विमा योजनेत जिल्ह्यातील मृग बहरातील फळपिकासाठी ६ हजार ४५५ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. पीक कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा शेतकऱ्यांनी ४ हजार ४२७ हेक्टरवरील फळ पिकांना संरक्षण दिले असून विम्यापोटी शेतकऱ्यांनी ३ कोटी ४ लाख ८७ हजार २५३ रुपयांची रक्कम भरली आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी, यासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत अर्ज करणे आवश्यक आहे.

नुकसान झाले तर, त्याचे पंचनामे होऊन, त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर केला जातो. त्यानंतर पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. पीकविम्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, यासाठी कृषी विभागाने गावागावात जनजागृती केली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक डाळिंब पीक आहे. त्याचा विमा शेतकरी भरतात. यंदाच्या हंगामात जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळपीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यानंतर आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. जिल्ह्यातील डाळिंब पिकासह द्राक्ष, पेरु, आणि लिंबू या पिकांचा विमा शेतकऱ्यांनी भरला आहे.

परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांत मगृ बहरातील डाळिंब पिकासह अन्य फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचे पंचनामेदेखील करण्यात आले. परंतु नुकसान झालेल्या पिकांचे भरपाई मिळाली नाही. त्यामुळे यंदाच्या मृग बहरात शेतकऱ्यांनी फळपीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी विमा घेतला असला तरी, नुकसान झाले तर भरपाई मिळणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

पीकनिहाय विमा भरलेल्‍या शेतकऱ्यांची संख्या व क्षेत्र

पीक शेतकरी संख्या क्षेत्र

डाळिंब ५९७६ ४२३८

द्राक्ष ४६७ १८०

लिंबू ११ ७

पेरू १ १

एकूण ६४५५ ४४२७

तालुकानिहाय फळपीक विमा भरलेले शेतकरी

तालुका शेतकरी संख्या

आटपाडी १८९०

जत ३६१०

कडेगाव १

कवठेमहांकाळ ५०४

खानापूर ३१

मिरज २४

पलूस ३४

तासगाव ३६१

एकूण ६४५५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT