Crop Insurance : पीकविम्यात उर्वरित पाच मंडलांचा समावेश करा

Crop Insurance Scheme : तालुक्यामध्ये खरीप हंगामात तीन महसूल मंडलांत २१ दिवसांचा अखंड असल्याने पीकविमा सर्वेक्षण सुरू करण्यात आले. आठ मंडलांपैकी पाच मंडलांचे सर्वेक्षण अद्याप बाकी आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Manglwedha News : तालुक्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मरवडे, मंगळवेढा, भोसे, बोराळे आणि पाटखळ या पाच मंडलांतील शेती क्षेत्राचाही समावेश करण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे मागणी केली.

तालुक्यामध्ये खरीप हंगामात तीन महसूल मंडलांत २१ दिवसांचा अखंड असल्याने पीकविमा सर्वेक्षण सुरू करण्यात आले. आठ मंडलांपैकी पाच मंडलांचे सर्वेक्षण अद्याप बाकी आहे. सर्वेक्षण न झालेल्या मंडलांमध्ये खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांची पाण्याअभावी अत्यंत विदारक स्थिती निर्माण झाली असून, त्या पिकांनी अक्षरशः माना टाकल्या आहेत.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा योजनेअंतर्गत २५ टक्के अग्रिम देण्याची अधिसूचना

अशा पिकांतून कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. सर्वेक्षणास पात्र असणाऱ्या या मंडलांमध्ये देखील पावसाचे प्रमाण अगदी नगण्य आहे. सद्यपरिस्थितीत नुकसानीच्या निकषामध्ये अत्यल्प पाऊस हे ग्राह्य न धरता २१ दिवसांचा कालखंड समजून तालुक्यातील पाच मंडलांतील या सर्वेक्षणामध्ये समावेश करण्याची मागणी लावून धरली.

Crop Insurance
Crop Insurance : नुकसान होऊनही पावसाचा खंड नियम परताव्याला बाधक

या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी या पाच मंडलांचे सर्वेक्षण करून याद्या सादर करण्याच्या सूचना देण्यास सांगितले. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत दक्षिण भागातील रेवेवाडी, पडळकरवाडी, लोणार, महमदाबाद हु, हुन्नूर, शिरनांदगी, मारोळी, बावची, पौट, सलगर बु, सलगर खु, लवंगी, आसबेवाडी, येळगी, सोड्डी, शिवणगी या गावांना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमधून पाणी सोडण्याची मागणी आमदार आवताडे यांनी या बैठकीत केली असता, तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या भागामध्ये सदर योजनेचे पाणी लवकरात लवकर सोडण्याचे आश्वासन देण्यात आले.

चारा छावण्या व चारा डेपो त्वरित सुरू करा

सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याबाबत पत्र दिले तसे पत्र देण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे सांगत, भीमा नदीच्या पाण्यावर मंगळवेढा शहर व पंढरपूर शहर अवलंबून असणाऱ्या भागाला नदीच्या कमी पाणीपातळीचा खूप मोठा फटका बसत असून, त्वरित चारा छावण्या व चारा डेपो सुरू करण्यासाठी कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार आवताडे यांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com