Dragon Fruit Agrowon
ताज्या बातम्या

Fruit Export Registration : पेरू-सीताफळ-ड्रॅगन फ्रूट निर्यातीसाठी नोंदणीची सुविधा

कृषी विभागाच्या आग्रहानंतर ‘अपेडा’चा निर्णय; उत्पादकांना लाभ

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर ः राज्यात पेरू, सीताफळ आणि ड्रगनफ्रुट (Dragon Fruit) या फळपिकांखालील लागवड क्षेत्राचा विस्तार वाढता आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने ‘अपेडा’शी (APEDA) पत्रव्यवहार करीत हॉर्टनेट (Hortinet) विभागातील अन्य फळ (अदर फ्रूट) श्रेणीत या फळांचा समावेश करण्यात यश मिळविले आहे.

राज्यातील निर्यातक्षम फलोत्पादकांना याचा मोठा फायदा होणार असल्याची माहिती कृषी पणन तज्ज्ञ गोविंद हांडे यांनी दिली.

रेसिड्यू फ्री किंवा चांगल्या प्रतीचा शेतीमाल उत्पादक असणाऱ्या भाजीपाला, फळ तसेच इतर प्रकारचा शेतीमाल उत्पादकांना नोंदणीची सुविधा ‘अपेडा’ने आपल्या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.

त्यामध्ये द्राक्ष उत्पादक ग्रेपनेट, खाण्याची पाने, कांदा, संत्रा, मोसंबी, लिंबू, भाजीपाला, डाळिंब अशा उत्पादनांचा समावेश आहे. हॉर्टनेट अंतर्गत असलेल्या अन्य फळे श्रेणीत आतापर्यंत तब्बल सात फळांचा समावेश करण्यात आला होता.

बेर, लिची, अननस, वॉटरचेस्टनट, वूड ॲपल (कवठ), केळी, जांभूळ या सात फळपीक उत्पादकांनाच यापूर्वी नोंदणी करता येत होती. आता मात्र पेरू, सीताफळ आणि ड्रॅगन फ्रूट या तीन नव्या फळपिकांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

परिणामी अन्य फळश्रेणीतील फळांची संख्या दहावर पोहोचली आहे. या फळपीक उत्पादकांना बागांची नोंदणी अन्य फळ श्रेणीत नोंदणी करता येणार आहे. बागांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाशी संपर्क साधावा लागेल.

या माध्यमातून महाराष्ट्रासह देशांतर्गत चांगल्या व निर्यातक्षम प्रतीच्या फळांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा डाटाबेस उपलब्ध होणार आहे, अशी माहिती हांडे यांनी दिली.

महाराष्ट्रात मुख्यत्वे घेण्यात येणाऱ्या सात ते आठ पेरू तसेच सीताफळ वाणांची नोंद घेण्यात आली आहे.

ड्रॅगन फ्रूटचे वाणांबाबतही अपेडाला कळविण्यात आले होते. या साऱ्यांची नोंद घेण्यात आल्याने कीडनाशकांचा अंशरहित (रेसिड्यू फ्री) फळ उत्पादकांना प्रमाणपत्र देणे सोयीचे होणार आहे.

पेरू, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट या तीन नव्या पिकांचा अंतर्भाव अन्य फळ श्रेणीत करण्यात आला आहे. परिणामी, या बागायतदारांना नोंदणी करता येईल.

यातूनच देशांतर्गत आणि देशाबाहेरील खरेदीदारांना दर्जेदार फळ उत्पादकांची माहिती उपलब्ध होण्यास मदत मिळेल.

निर्यातीला यामुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे. याविषयी कृषी विभागाच्या माध्यमातून अपेडाकडे पाठपुरावा करण्यात आला. आता अन्य फळ श्रेणीतील फळांची संख्या दहावर पोहोचली आहे.
- गोविंद हांडे,
कृषी पणन तज्ज्ञ, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT