चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशातून यंदा कांदेबाग (ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या बागा) केळीची परदेशातील निर्यात (Export) प्रथमच ३०० कंटेनरवर पोहोचली आहे.
खानदेशात यंदा ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान निर्यातक्षम केळीचा मोठा तुटवडा होता. या दरम्यान खानदेशातील केळीचे आगार (Banana) असलेल्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागांत केळी काढणीवर नव्हती. तसेच देशात उत्तर प्रदेशातील गोरखपूर व गुजरातमध्ये या काळात केळी काढणीवर होती. परंतु ती निर्यातीसाठी अपेक्षित निघत नव्हती. राज्यात सोलापुरातील टेंभुर्णी व परिसरातही या काळात निर्यातीसाठी केळी उपलब्ध नव्हती.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील कांदेबाग केळीसाठी प्रसिद्ध चोपडा, जळगाव, भडगाव-पाचोरा, धुळ्यातील शिरपूर भागांतील केळीला उठाव होता. या भागात कांदेबाग केळीसाठी अनेक शेतकऱ्यांनी २०२१ मध्ये फ्रूटकेअर व्यवस्थापन व निर्यातक्षम उत्पादनाकडे लक्ष दिले. यामुळे या भागांत दर्जेदार केळी काढणीसाठी उपलब्ध झाली. देशात या काळात निर्यातक्षम केळी कमी असल्याने चोपडा, जळगाव, शिरपूर, भडगाव-पाचोरा, जामनेर भागातील केळीला उठाव मिळाला. तिची परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात झाली.
मागील वर्ष सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात खानदेशातून फक्त ४० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची आखातात निर्यात झाली. यंदा ही निर्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर या दरम्यान सुमारे ३०० कंटेनर झाली आहे. अर्थात, यात यंदा मोठी वाढ झाली आहे. सुमारे १० कंपन्या निर्यातीसाठी कार्यरत होत्या. यामुळे स्थानिक बाजारात केळीची आवक वाढून कुठलाही दबाव तयार झाला नाही. तसेच दर टिकून राहिले. .
निर्यातीच्या केळीला २००० रुपये दर निर्यातीच्या केळीला २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर सलग अडीच महिने मिळाला. तसेच स्थानिक बाजारातही केळीला १६००, १५००, १२००, १००० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दर्जानुसार मिळाला. कांदेबाग केळीची काढणी पूर्ण झाली आहे. यामुळे अजूनही दर टिकून आहेत. कमाल दर १६०० व किमान दर ८०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे.
आगाप कांदेबाग केळीची काढणी ऑगस्ट ते ऑक्टोबर या दरम्यान झाली. तिची १०० टक्के खातातील इराण, इराक, कतार, सौदी अरेबिया या भागांत निर्यात केली. १० निर्यातदार कंपन्यांनी आमच्या भागात केळीच्या खरेदीचे व निर्यातीचे काम केले. दरही दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा मिळाला. - संदीप पाटील, केळी उत्पादक, वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.