Nanded News : खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘रेकॉर्ड ब्रेक’ सहभाग घेतला आहे. तब्बल ११ लाख ८७ हजार ८०२ अर्जदार शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद व खरीप ज्वारी या पिकांसाठी केवळ एक रुपया भरून विमा योजनेत भाग घेतला.
यात सात लाख ४३ हजार ७६६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. कंपनीकडे शेतकऱ्यांसह राज्य व केंद्र शासनाचा ६६२ कोटी ३० लाखांचा विमा हप्ता जमा होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.
पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३-२४ करिता जिल्ह्यात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नेमणूक केली आहे. प्रारंभी ता. १ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पीकविमा भरण्याची मुदत होती. यानंतर तीन ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
या कालावधीत सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, ज्वारी, उडीद या सहा पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा भरला. विमा कंपनीकडे शेतकऱ्यांचा प्रति अर्ज एक रुपया, राज्य शासनाचे ३७७ कोटी ६९ लाख, केंद्र शासनाचे २८४ कोटी ५० लाख असा एकूण ६६२ कोटी ३० लाखांचा विमा हप्ता जमा होणार आहे.
यातून तीन हजार ९६१ कोटी ४३ लाख रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात आजपर्यंतच्या काळात यंदा सर्वात अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. मागील वर्षी दहा लाख ६७ हजार ८०४ अर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता.
पीकनिहाय सहभागी शेतकरी संख्या (क्षेत्र हेक्टरमध्ये)
पीक शेतकरी संख्या विमा संरक्षित क्षेत्र विमा हप्ता
सोयाबीन ८,२३,७७७ ६,१९,११८.४६ ६०७ कोटी ३६ लाख
कापूस १,६०,८९६ ८१,६२९.७८ ३९ कोटी ९० लाख
मूग ७५,०३७ १४,८२८.२५ ३ कोटी ९६ लाख
उडीद ५६,७५२ ११,३९३.५८ ६०७ कोटी ३६ लाख
तूर ५६,३८९ १२,४५१.४३ ६ कोटी ६५ लाख
ख.ज्वारी १४,९५१ ४,३४५.४२ १ कोटी ७ लाख
एकूण ११,८७,८०२ ७,४३,७६६.९१ ६६२ कोटी ३३ लाख
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.