Crop Insurance : पीकविम्याला २१ हजारांवर शेतकऱ्यांची नापसंती

Crop Insurance Scheme : एक रुपयात पीकविमा काढण्याची सुविधा शासनस्तरावरून उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील २१ हजार ७१२ शेतकऱ्यांनी या योजनेला प्रतिसादच दिला नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Bhandara News : एक रुपयात पीकविमा काढण्याची सुविधा शासनस्तरावरून उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील २१ हजार ७१२ शेतकऱ्यांनी या योजनेला प्रतिसादच दिला नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी तीन वेळेस अतिवृष्टी झाली. नदी-नाल्यांशेजारील जमीन खरडून गेली. पिकाचे पांढरे तण तेवढे पूरग्रस्त शिवारात शिल्लक होते.

शासनाच्या वतीने या आपद्‍ग्रस्तांना भरपाई देण्यात आली. परंतु ज्या कंपन्यांकडे पीकविमा काढला होता. त्या कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून याची कोणतीच दखल घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी नियमानुसार ७२ तासांच्या आत कंपनीच्या पोर्टलवर तक्रारही नोंदविली होती.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा काढण्याकडे यंदा कल

ऑनलाइन तक्रारीनंतर एक रुपयादेखील पदरात न पडल्याने शेतकऱ्यांनी या वेळी एक रुपयात असलेल्या विम्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा या भागातील शेतकऱ्यांकडून पीकविमा भरपाई अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्याचे चित्र आहे.

सुरुवातीला एक लाख शेतकऱ्यांचा आकडादेखील योजनेअंतर्गत पार करणे अशक्‍य वाटत हेते. त्यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांनी यंत्रणांना कामाला लावले.

परिणामी, भंडारा जिल्ह्यातील २ लाख ७७ हजार ९१२ खातेदारांपेकी २ लाख ५६ हजार २११ शेतकऱ्यांनी विमा काढला. याची टक्‍केवारी ९२ इतकी आहे. मात्र त्यानंतर देखील २१ हजार ७१२ शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरविल्याची स्थिती आहे.

Crop Insurance
Crop Insurance : नुकसानग्रस्तांना किमान हजार रुपये पीकविमा मिळणार

सुमारे ८९ हजार ५९० बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत व अन्य बॅंकांच्या माध्यमातून पीकविमा योजनेचा लाभ घेतला. कर्जदार पीकविमाधारकांची संख्या १ लाख ६६ हजार ६२१ इतकी आहे. जिल्ह्यातील बॅंकांना शेतकऱ्यांचे पीकविमा चलन भरण्यासाठी मंगळवार (ता. १५) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात २ लाख ५६ हजार २११ शेतकऱ्यांनी १,२४,८७९,४१ हेक्‍टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे.

तालुकानिहाय्य सहभागी शेतकरी

भंडारा २१८६०

मोहाडी ४०९१८

तुमसर ४१०८६

पवनी ३८१६१

साकोली ३१८४९

लाखांदूर ३९५२८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com