Crop Insurance : खानदेशात कापूस पिकासाठी अधिक विमा संरक्षण प्रस्ताव

Cotton Crop Insurance : एक रुपयात पीकविमा योजनेत खानदेशात सुमारे सव्वासहा लाख शेतकरी सहभागी झाले आहेत.
Cotton Crop
Cotton CropAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिली आहे. एक रुपयात पीकविमा योजनेत खानदेशात सुमारे सव्वासहा लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. यात कापूस पिकासाठी सर्वाधिक सहा लाख हेक्टर क्षेत्रासंबंधी विमा संरक्षण घेण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात ४ लाख ५४ हजार २७७ शेतकरी सहभागी झाले असून, त्यांनी ४ लाख ५९ हजार ८८८ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. दरम्यान, सर्वाधिक प्रतिसाद कापूस पिकासाठी मिळाला असून, जळगाव जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार ५४६ शेतकऱ्यांनी कापूस पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे.

Cotton Crop
Crop Insurance : विम्यात पारनेर, पाथर्डी, कर्जतमधून सर्वाधिक सहभाग

धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे दीड शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतही कापूस पिकासाठी सर्वाधिक विमा संरक्षण प्रस्ताव किंवा अर्ज सादर झाले आहेत. योजनेमध्ये सहभागासाठी प्रथम ३१ जुलै ही अंतिम मुदत होती.

गतवर्षी प्रधानमंत्री पीकविमा खरीप हंगाम योजनेत जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ५८६ शेतकरी सहभागी झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण दोन पट जास्त आहे.

Cotton Crop
Crop Insurance : लातुरात पीकविमा कंपनीच्या कार्यालयात मनसेचा राडा

जळगाव जिल्ह्यातील एक रुपयात पीकविमा पोटी १७७६ कोटी ९४ लाख ४६ हजार २३० रुपये रक्कम संरक्षित करण्यात आली आहे. सर्वाधिक कापूस, त्याखालोखाल मका, सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, उडीद, बाजरी, भुईमूग व तीळ या पिकांचा विमा काढण्यात आला आहे.

नुकसान झाल्यास परतावा

प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी कृषी, महसूल विभागाने जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. यामध्ये गावागावात जाऊन शेतकऱ्यांना पीकविम्याचे फायदे सांगण्यात आले. पीक पेरणी ते काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती, आग, गारपीट, वादळ, चक्रीवादळ यामुळे होणारे पिकांच्या नुकसानीत शेतकऱ्यांना परतावा मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com