Tomato Market  Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Market : पिंपळगाव बसवंतमध्ये विक्रमी ३ लाख टोमॅटो क्रेटची आवक

Tomato Rate : गेल्या तीन दिवसांत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी, मागणी व पुरवठ्याचे गणित पूर्णपणे विस्कळीत झाले असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात टोमॅटो आवकेसाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २०) बाजार आवारात सुमारे ३ लाख ३८ हजार क्रेट्सची विक्रमी आवक झाली. तर बाजारभाव प्रति क्रेट सरासरी ७५ रुपये असा राहिला. सध्या वाहतूक खर्चही परवड नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

गेल्या तीन दिवसांत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी, मागणी व पुरवठ्याचे गणित पूर्णपणे विस्कळीत झाले असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान, वाढलेली आवक व घटलेल्या मागणीमुळे दर खाली आले आहेत.

जुलै व ऑगस्ट महिन्यांत टोमॅटोची बाजार आवरात आवक मोठ्या प्रमाणात कमी असल्याने प्रतिक्रेट तीन हजार रुपयांवर दर मिळत होते. मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यल्प असल्याने टोमॅटोची लाली खुलली होती.

मात्र आता आवक वाढल्याने चिखल झाल्याची परिस्थिती आहे. यापूर्वी दर जास्त मिळाल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड वाढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १५ सप्टेंबरअखेर २० हजार ५०४ हेक्टर क्षेत्रावर लागवडी झालेल्या आहेत.

त्यामुळे १५ ऑगस्टपासून आवक बाजारात वाढती असल्याने दराला मोठा फटका बसला आहे. मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्याने प्रतिक्रेट दर शंभर रुपयांच्या आत घसरले आहेत.

जिल्ह्याभरातून सुमारे ३ हजार वाहनांतून आवक आल्याने पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या जोपूळ व चिंचखेड चौफुलीवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. बाजार समितीचे आवार आणि रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवेशद्वारापासून एक किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

चालू महिन्यात झालेली विक्रमी आवक

तारीख...आवक (क्रेट)...सरासरी क्रेट दर (रुपये)

१३ सप्टेंबर...३ लाख ११ हजार ९९५...७१

१५ सप्टेंबर...३ लाख २४ हजार ७७५...८१

१८ सप्टेंबर...३ लाख ६८ हजार २१५...८५

२० सप्टेंबर...३ लाख ३८ हजार ८०५...७५

क्रेटचे सरासरी दर आले हजारावरून १०० रुपयांवर

मागील ऑगस्ट महिन्यात १ तारखेला किमान आवक ९७५ क्रेट होती. त्यात वाढ होऊन महिना अखेर १२ लाख ९५ हजार ३८५ क्रेट आवक होती. ऑगस्टमध्ये प्रतिक्रेट दर किमान ५० रुपये कमाल ३,३५१, तर सरासरी १,००१ रुपये दर होते. तर चालू महिन्यात (२० सप्टेंबरअखेर) ४२ लाख २२ हजार ४१४ क्रेट आवक झाली आहे.

मागील महिन्याच्या तिपटीने ही आवक चालू महिन्यात झाली आहे. आवक अधिक असून, किमान ३०, कमाल ३५१, तर सरासरी ११८ रुपये दर मिळाले आहेत. मागील महिन्यात ३१ हजार ६७९ शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्री केला होता, तर चालू महिन्यात ९२ हजार ६७ शेतकऱ्यांनी माल विकला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Post Monsoon Rain: मॉन्सूनोत्तर पाऊसही सरासरीपेक्षा अधिक

Maharashtra Rain Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामान

Rain In October 2025 : देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज; राज्यावर पावसाचं सावट

Farmer Union Protest: ओला दुष्काळ, ५० हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी शेतकरी-शेतमजूर संघटनांचे आयुक्तांना निवेदन

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पुन्हा जोरदार पाऊस; भातपीक कापणी रखडली

SCROLL FOR NEXT