Tomato Market : टोमॕटोचे प्लाॅट सोडून देण्याची वेळ

Tomato Market Rate : यंदा मॉन्सूनने दडी मारल्यामुळे कीड-रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने वांगी परिसरातील फळपिके जोमात आहेत. शिवाय महिन्यापूर्वी टोमॕटोला उच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी खुशीत होते.
Tomato Market
Tomato MarketAgrowon

Latest Agriculture News : टोमॕटोचे दर गडगडल्याने वांगी (ता. कडेगाव) परिसरातील टोमॕटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. फलधारणा होईपर्यंत केलेला खर्चही निघण्याची शाश्वती नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॕटोचे प्लॉट सोडून दिल्याचे चित्र आहे.

यंदा मॉन्सूनने दडी मारल्यामुळे कीड-रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने वांगी परिसरातील फळपिके जोमात आहेत. शिवाय महिन्यापूर्वी टोमॕटोला उच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी खुशीत होते. मात्र सध्या टोमॕटोचा भाव प्रतिकिलो ३ ते ५ रुपयांपर्यंत घसरला आहे.

Tomato Market
Tomato Rate : ९०० किलो टोमॅटोला मिळाले फक्त ३४ रुपये, ट्रॅक्टर घेण्याच्या स्वप्नाचा चुराडा

या पिकासाठी फळ येईपर्यंत एकरी २५ हजार रुपये खर्च होतात. किमान दुप्पट नफा मिळावा, एवढी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा असते. दर प्रचंड घसरल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. तोडणीचा खर्चही भागत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॕटो प्लॉट सोडून दिले आहेत. या पिकांसाठी किमान २० रुपये प्रतिकिलो दराची अपेक्षा फोल ठरल्याने टोमॕटो उत्पादक आर्थिक संकटात आहेत.

Tomato Market
Tomato Market : निफाडला महामार्गावर टोमॅटो फेकला; ‘स्वाभिमानी’ आक्रमक

टोमॕटोला दर नसल्याने डॉ. विजय होनमाने, प्रशांत बोडरे, रामभाऊ होनमाने, रामभाऊ शिंदे, सुहास माळी, संजय साळुंखे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. लहरी हवामान, अशाश्वत बाजारभाव याचा फटका पुनःश्‍च वांगी परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे.

प्रचंड कष्ट आणि अधिक आर्थिक गुंतवणूक करून शेतकरी फळभाज्या, पिके घेतो. मात्र या पिकांना हमीभाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने अशा पिकांसंदर्भात शाश्वत धोरण आखणे आवश्‍यक आहे.- पवन जानकर, टोमॕटो उत्पादक शेतकरी, वांगी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com