Raju Shetti Ravikant Tupkar agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetti Ravikant Tupkar : मी कुठेही जाणार नाही, राजू शेट्टींच्यासोबत काम करणारः तुपकर

Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर थेट नाराजी व्यक्त केली होती.

Team Agrowon

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर थेट नाराजी व्यक्त करत आरोप केले होते. दरम्यान यावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज (ता.०८) पुणे येथील विश्रामगृहात कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. दरम्यान तुपकर या बैठकीस न जाता बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत आपली पुढची दिशा स्पष्ट केली.

तुपकर पत्रकार परिषदेत म्हणाले, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. राजू शेट्टी यांच्यासोबत राहूनच काम करणार असल्याची भूमिका तुपकर यांनी भूमिका मांडली. मी या पक्षात जाणार, मी त्या पक्षात जाणार अशा अफवा सुरु आहेत. त्या अफवा थांबवाव्यात असेही ते म्हणाले.

मला संघटनेतच राहूनच काम करायचे आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मला शेतकऱ्यांसाठी लढत राहायचंय. यासाठी मी आजपासून कामाला लागलो असल्याची तुपकर असल्याचे सांगितलं. गेल्या चार ते पाच वर्षात अनेकवेळा राजू शेट्टी यांच्यासमोर मी माझी भूमिका मांडली आहे पुण्यात जाऊनही मला तेच बोलायचे असल्याचे तुपकर म्हणाले.

मला नेतृत्वानं प्रामाणिकपणानं काम करु द्यावं अशी माझी भूमिका असल्याचे ते म्हणाले. शेतकरी प्रश्नांवर लढण्यासाठी महाराष्ट्रात तरुण पोरांची मोठी फौज उभारणार असल्याचे तुपकर म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढवण्यात लाखो कार्यकर्त्यांचे योगदान आहे. या सर्वच कार्यकर्त्यांची ही संघटना आहे. आजच्या पुण्यातील बैठकीत त्यांची नेमकी भूमिका काय ठरते ते पाहुयात असेही तुपकर यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये हीच माझी इच्छा आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे भले झाले पाहिजे हीच माझी भूमिका आहे. विशीष्ट प्रदेशातील शेतकऱ्यांचे हित न होता महाराष्ट्रातील सगळ्याच शेतकऱ्यांचे हित झाले पाहिजे. चळवळ नेटाने वाढली पाहिजे हीच माझी भूमिका असल्याचे तुपकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT