Ratnagiri Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Ratnagiri Rain Update : रत्नागिरीत जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच

Latest Rain Update : एक हजार मिलिमीटरची सरासरी पार करण्यासाठी यावर्षी पावसाने दीड महिन्याचा कालावधी घेतला. गतवर्षीपेक्षा यंदा चारशे मिमी सरासरी कमी पावसाची नोंद झाली आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : एक हजार मिलिमीटरची सरासरी पार करण्यासाठी यावर्षी पावसाने दीड महिन्याचा कालावधी घेतला. गतवर्षीपेक्षा यंदा चारशे मिमी सरासरी कमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या सरींचा पाऊस पडत असल्यामुळे भात लावणीसाठीची कामे बळीराजा करत आहे. जून महिन्यात मॉन्सून उशिरा दाखल झाल्यामुळे पेरण्या लांबल्या आणि शेतीच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

एलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊस अनियमित राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात होणारे मॉन्सूनचे आगमन शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबले. त्यामुळे भात पेरण्याही उशिराने सुरू करण्यात आल्या होत्या. धूळवाफ पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांनी रोपे रुजून यावीत यासाठी पंपाने पाणी दिले होते. २२ जुलैनंतर पावसाला सुरुवात झाली.

जूनमध्ये सरासरी ८२० मिमी पाऊस पडतो; मात्र यंदा अखेरपर्यंत २०० मिमी कमी नोंद झाली. त्यानंतरही पावसाची अनियमितता सुरूच आहे. अद्याप २० टक्केच लावण्या झाल्या आहेत. आषाढ संपून श्रावण महिना सुरू झाला तरीही कोकणाची ओळख असलेल्या मुसळधार पावसाची प्रतीक्षाच आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १००० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडतो. ही आकडेवारी पार करण्यासाठी यावर्षी एक महिना तेरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागला.

जुलैतही पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे या महिन्याची १२०० मिमीची सरासरी पार करणेही शक्य नसल्याचेच दिसते. जिल्ह्यात एकूण सरासरी पाऊस ३३०० मिमी पडतो. दीड महिन्यात ३५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अजूनही जिल्ह्यातील काही धरणे पूर्णतः भरलेली नाहीत.

जुलैच्या अखेरपर्यंत धरणे भरून वाहू लागतील असा अंदाज आहे. गतवर्षी याच कालावधीत दीड हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. तुलनेत चारशे मिमी कमी पाऊस झाला आहे. ही सरासरी पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संगमेश्‍वर आणि रत्नागिरी या दोनच तालुक्यांत १००० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या दोन्ही तालुक्यांत गतवर्षी अनुक्रमे १५०९ आणि १४३५ मिमी नोंद होती. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या संगमेश्‍वर तालुक्यात यंदा सर्वांत कमी पाऊस नोंद झाली आहे. यंदा सर्वाधिक पाऊस दापोलीत पडला.

तालुका आजपर्यंतचा पाऊस

मंडणगड ११५५

दापोली १३३८

खेड ११९३

गुहागर १०६२

चिपळूण १०१५

संगमेश्‍वर ९४०

रत्नागिरी ९७२

लांजा १११५

राजापूर १०७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT