Kharif Season Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season : खरिपात तूर, मुग, सोयाबीन बियाणे बदलाचे प्रमाण कमी

Soybean Seed :शेतपिकांची पेरणी करताना सुधारित वाणांची पेरणी करावी आणि त्यानुसार बियाणे बदलाचे प्रमाण असावे यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : शेतपिकांची पेरणी करताना सुधारित वाणांची पेरणी करावी आणि त्यानुसार बियाणे बदलाचे प्रमाण असावे यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहे. मात्र गेल्यावर्षीचा अनुभव पाहता यंदा कृषी विभागाने प्रस्तावित केलेल्या बियाणे बदलाच्या प्रमाणानुसार खरिपात तूर, मुग, सोयाबीनच्या बियाणे बदलाचे प्रमाण कमीच आहे. बाजरी आणि कापसात शंभर टक्के बियाणे बदलाचे प्रमाण आहे. बाजरीत गेल्यावर्षी शंभर टक्के बियाणे बदलाचे प्रमाण साध्य झाले होते.

राज्यात यंदा खरिपाच्या पेरण्याला उशीर होतोय. चार पाच-सहा दिवसापासून पाऊस सुरू झाला असला तरी अजूनही अनेक भागात पाऊस नाही. उशीर झाल्याने मुग, उडदाच्या पेरण्या होण्याची आता शक्यता फारच कमी झाली आहे. त्यामुळे त्याजागी कापूस, सोयाबीन, मका, बाजरीचे क्षेत्र वाढू शकते. काही भागात कांदाचेही क्षेत्र वाढू शकते असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

दरम्यान खरिपाच्या पेरण्या होण्याआधी मागील तीन वर्षी झालेल्या पेरण्याचा अंदाज व त्या वर्षी शेतकऱ्यांनी बियाणे बदलाचे प्रमाण गृहीत धरुन कृषी विभागाकडून बियाणांची मागणी केली जाते. यंदाही कृषी विभागाने मागील वर्षीचे बियाणे बदल साध्य पाहूनच मागणी केली आहे.

शेतकऱ्यांचे शेती उत्पादन दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे विशेष प्रयत्न आहेत. उत्पादन दुप्पट करायचे असेल तर कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेले, नवे वाण वापरावे लागणार आहेत. मात्र गेल्यावर्षीचा वापर व यंदाचे प्रस्तावित प्रमाण पाहता बियाणे बदलात अजूनही पारंपरिक बियाणे वापरावर भर असल्याचे पाहायला मिळत आहे.

बियाणे बदलाचे यंदाचे प्रस्तावित प्रमाण (टक्के) (कंसात गतवर्षीचे साध्य)

- भात ः ४० (४४)

- बाजरी ः १०० (१००)

- मका ः ७५ (९१)

- तूर ः ३५ (१२)

- मुग ः १२ (११)

- उडीद ः ४० (४७)

- सोयाबीन ः ३५ (२०)

- कापूस ः १०० (७४)

कृषी विद्यापीठांचे आवाहन

खरिपासाठी सोयाबीन, तूर, मुग, बाजरी, मका व अन्य पिकांचे सुधारित नवे बियाणे वापरले तर उत्पादनात वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी राज्यातील कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेले बियाणे शेतकऱ्यांनी वापरावे, असे सातत्याने आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Bodies Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Cotton Rate: गुणवत्तेच्या कापसाला मागणी, दरातही सुधारणा; सीसीआयची खरेदीही वाढली

Organic Produce Market: खामगाव येथे सेंद्रिय शेतीमाल विक्री केंद्र सुरू

Soil Fertility: जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी उपाययोजना

Cotton Procurement: 'सीसीआय’ची कापूस खरेदी प्रक्रिया वेगात

SCROLL FOR NEXT