Raju Shetti agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetti : अन्यथा असूड घेऊन दुसरा हप्ता वसूल करणार, राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा

Sugar Factory : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफ.आर.पी अधिक ४०० रूपये दुसरा हप्ता देण्याची मागणी केली.

sandeep Shirguppe

Sugarcane Rate : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफ.आर.पी अधिक ४०० रूपये दुसरा हप्ता देण्याची मागणी केली होती. या मागणीच्या जवळपास एफ. आर.पी पेक्षा ३५० रूपयाचा दुसरा हप्ता राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भिमा शंकर साखर कारखान्याने जाहीर केला. यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील इतर कारखानदारांना थेट इशारा दिला आहे.

यावेळा माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट करत थेट कारखानदारांना इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफ.आर.पी अधिक ४०० रूपये दुसरा हप्ता देण्याची मागणी केली होती.

या मागणीच्या जवळपास एफ. आर.पी पेक्षा ३५० रूपयाचा दुसरा हप्ता राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भिमा शंकर साखर कारखान्याने जाहीर केला.

आतातरी राज्यातील साखर कारखान्यांनी तातडीने दुसरा हप्ता ४०० रूपये जाहीर करावा अन्यथा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना असूड घेऊन घामाच्या दामाच्या ४०० रूपयाचा दुसरा हप्ता वसूल करावा लागेल. अशी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पोस्ट केली आहे.

भीमाशंकर कारखान्याकडून ३५० रुपये दुसरा हफ्ता

२०२२ -२३ हंगामात गाळप झालेल्या उसासाठी २७५१ रुपये एफआरपी प्रमाणे देण्यात आले आहेत. दरम्यान उर्वरित ३५० रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार असून, त्यामध्ये ५० रुपये भाग विकास निधीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या पूर्वी शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा उसाचा दर जादा दिल्यास वरील उत्पन्न हे कारखान्याचे समजून कारखान्यांना त्या रकमेचा इन्कमटॅक्‍स भरावा लागत होता.

मात्र आता केंद्र शासनाने इन्कम टॅक्‍स माफ केला आहे. त्यामुळे भविष्यात जादा दर देताना अडचण येणार नाही. मागील वर्षी एकूण १४ लाख ६० हजार २५६ क्विंटल साखर विकली गेली असून ५ लाख ४० हजार ४५० क्विंटलची साखर निर्यात केली असल्याची माहिती देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT