Dilip Valase -Patil : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या कारखान्याकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट, दुसरा हफ्ता ३५० रुपये जाहीर

Bhima Shamkar Sugar Factory : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नगर जिल्ह्यातील भीमाशंकर कारखान्याकडून उसाचा अंतिम दर ३ हजार १०० जाहीर करण्यात आला.
Dilip Valase -Patil
Dilip Valase -Patilagrowon
Published on
Updated on

Minister Dilip Valase -Patil : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नगर जिल्ह्यातील भीमाशंकर कारखान्याकडून उसाचा अंतिम दर ३ हजार १०० जाहीर करण्यात आला. दरम्यान यामध्ये त्यांनी उसाचा दुसरा हफ्ता ३५० रुपये देण्याचे जाहीर केले. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

२०२२ -२३ गाळप हंगामात गाळप झालेल्या उसासाठी २७५१ रुपये एफआरपी प्रमाणे देण्यात आले आहेत. दरम्यान उर्वरित ३५० रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार असून, त्यामध्ये ५० रुपये भाग विकास निधीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या पूर्वी शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा उसाचा दर जादा दिल्यास वरील उत्पन्न हे कारखान्याचे समजून कारखान्यांना त्या रकमेचा इन्कमटॅक्‍स भरावा लागत होता.

मात्र आता केंद्र शासनाने इन्कम टॅक्‍स माफ केला आहे. त्यामुळे भविष्यात जादा दर देताना अडचण येणार नाही. मागील वर्षी एकूण १४ लाख ६० हजार २५६ क्विंटल साखर विकली गेली असून ५ लाख ४० हजार ४५० क्विंटलची साखर निर्यात केली असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सोमेश्‍वर, माळेगाव कारखान्यांनी जो दर दिला तो दर भीमाशंकर कारखान्याने द्यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र इतर कारखान्यांशी आपली तुलना करणे योग्य नाही. त्या कारखान्यांमध्ये व आपल्या कारखान्यांमध्ये फरक आहे.

Dilip Valase -Patil
Sugar Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची दरवाढ कायम ; सातत्याने ५० हजार रुपयांवर दर

माळेगाव कारखान्याकडे इथेनॉल प्रकल्प असल्याने त्यांचे उत्पन्न जास्त आहे. माळेगाव, सोमेश्‍वर कारखाना सभासदांना वेगळा दर देतात, तर बाहेरून ऊस घेऊ न येणाऱ्यांना वेगळा दर देतात. मात्र, भीमाशंकर सर्वांना एकच दर देत असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली.

पारगाव दत्तात्रय नगर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची २७ वी वार्षिक सभा काल (ता. २६) भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी कारखाना उत्तमरीत्या काम करत असून लेखा परीक्षण अहवालात कारखान्यास अ ऑडिट वर्ग मिळाला असल्याचे बेंडे पाटील यांनी सांगितले.

कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा मांडला. कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांनी विविध प्रश्‍न उपस्थित करून ती सोडवण्याची मागणी केली. अशोक करंडे, अरुण ढोमे, विठ्ठल ढगे पाटील, बळवंत बोबे, तुकाराम गावडे यांनी चर्चेत भाग घेतला. अहवाल वाचन कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. सुदाम खिलारी यांनी, तर उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com