Raju Shetti vs Prakash Awade : राजू शेट्टी अन् साखर कारखानदारांमधील संघर्ष अटळ? आमदार प्रकाश आवाडेंनी दिलं आव्हान

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येने कोल्हापूर जिल्हा साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
Raju Shetti vs Prakash Awade
Raju Shetti vs Prakash Awadeagrowon
Published on
Updated on

Kolhapur Sugarcane Factory : मागच्या आठवड्यात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येने कोल्हापूर जिल्हा साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी राजू शेट्टी यांनी उसाला ४०० रुपये दुसरा हफ्ता दिला नाहीतर शेतकरी कारखानदांच्या कानाखाली वाजवायलाही मागे पुढे पाहणार नाही अशी टीका केली होती. यावर आता कारखानदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दोन दिवसांपूर्वी कारखाना कार्यस्थळावर पार पडली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेत हिम्मत असेल तर कानाखाली लावून दाखवा. कारखाना कार्यस्थळावरून कसे जाता आम्ही बघतो अशा शब्दात संतप्त भावना व्यक्त केली.

आमदार आवाडे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पदरात जास्त पैसे कसे पडतील याचा विचार करूया. सर्वजण मिळून सरकारच्या दारात बसुया. वेगळ्या पद्धतीचे राजकारण कुणीही करू नये. तोंडाला थोडा लगाम घाला. कुठे बोलतो ? काय बोलतो, याचे भान ठेवा अशा संतप्त भावना आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केल्या.

ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन चारशे रुपये मिळायला पाहिजे, या मताशी आम्हीही ठाम आहे. पण सध्या साखरेचा ३१०० रुपये दर पाहता अडचणीचे झाले आहे. केंद्र सरकारने साखरेचा दर ३८०० रुपये केला पाहिजे. त्यासाठी आंदोलन करावे लागले तरी करू.

Raju Shetti vs Prakash Awade
Sugarcane Farmer Kolhapur : कोल्हापुरच्या शेतकऱ्याचा नादखुळा, उसात पाच आंतरपिके घेत ठेवला नवा आदर्श

"सरकारनेच कर्ज उभारून प्रत्येक टनाला चारशे रुपये देऊन ते थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करावेत. तसा ठराव सर्वसाधारण सभेत करत असल्याचे सांगून सरकारकडून चारशे रुपये घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा आवाडेंनी दिला.

दरम्यान वार्षीक सर्वसाधारण सभेवेळी स्वाभिमानीचे सावकार मादनाईक, वैभव कांबळे, सागर शंभुशेटे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी उसाच्या दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी निवेदन दिले. यानंतर काही काळाने आमदार आवाडे कार्यक्रमास्थळी बोलण्यास उभे राहिले यावेळी त्यांनी आक्रमक होत राजू शेट्टींचे नाव न घेता टीका केली. दरम्यान भविष्यात कारखानदार आणि राजू शेट्टी हा संघर्ष पुन्हा पहायला मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.

काय म्हणाले होते राजू शेट्टी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक चारशे रुपये इतकी रक्कम दिवाळीपूर्वी मिळाली पाहिजे, अन्यथा साखर कारखान्यांची धुराडी पेटवू देणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान ४०० रूपये शेतकऱ्यांना दिले नाही तर आगामी ऊस गळीत हंगामात शेतकऱ्यांना संघर्षाची भूमिका घेणे भाग पडेल, तसेच कारखानदारांनी ४०० रूपये देण्यास टाळाटाळ केली तर शेतकरी कारखानदारांच्या कानाखाली वाजवायलाही मागेपुढे बघणार नाही अशी जोरदार टीका राजू शेट्टी यांनी केली होती.

या वार्षीक सर्वसाधारणसभेवेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, माजी अध्यक्ष उत्तम आवाडे, केन कमिटी अध्यक्ष राहुल आवाडे, स्वप्नील आवाडे, सुधाकर मणेरे, संचालक आण्णासाहेब गोटखिंडे, प्रकाश दत्तवाडे, स्वाभिमानीचे आण्णासाहेब चौगुले, सुजितसिंह मोहिते, आण्णासाहेब भोजे, शिवराज नाईक, कल्लाप्पा गाट आदींसह सभासद उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com